कन्हान प्रतिनिधी:कन्हान -.श्री.श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक लोकसभा दिनांक 4/5/2025 ला त्यांचा कार्यालय इथे जाऊन निवेदन देण्यात आले.
पारशिवनी क्षेत्रामध्ये जवळपास एकूण 120 गावांच्या समावेश आहे.. त्यात कन्हान येथे नगरपरिषद आहे व कांद्री येथे नगरपंचायत आहे परंतु पारशिवनी तहसील क्षेत्रात प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र नसल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याकरिता 50 ते 60 किलोमीटर अंतर्गत नागपूर सारख्या शहरात ज्याने येणे करावे लागतीते ज्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक तणाव तसेच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो पारशिवनी तहसील अंतर्गत प्रशासकीय प्रशासन केंद्र सुरू झाल्यास सार्वजनिक तहसील क्षेत्रातील विद्यार्थ्यांना खूप मोठा प्रमाणात लाभ होईल याकरिता पारशिवनी तहसील क्षेत्रामध्ये प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र लवकरात लवकर उघडण्यात यावे ही मागणी निवेदनामार्फत मा.श्री.श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक लोकसभा यांना करण्यात आली आहे..
याप्रसंगी उपस्थित नगरपरीषद कन्हान पिंपरी माझी उपाअध्यक्ष योगेश रंगारी, नगरसेवीका रेखा टोहणे व सामाजिक कार्यकर्ता प्रशांत बाजीराव मसार, शरद वाटकर, गौरव माहोरे , देवा चतुर आदी...
