महाराष्ट्र वेदभुमी

चाललंय काय? अर्धवट सर्व्हिस रोडचे काम केव्हा होणार पूर्ण?



रामटेक अंबाला नर्सरीजवळ सर्व्हिस रोडच्या अपूर्ण कामाचे दृश्य.

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : मनसर-रामटेक-सालई (खुर्द) ४४किमी लांबीच्या तुळणे सिमेंट महामार्गाचे भूमिपूजन ५ फेब्रुवारी २०१९ रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. मात्र ६ वर्षांनंतरही महामार्गाच्या सर्व्हिस रोडचे काम अपूर्णच आहे. गावांकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्याचे काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील नागरिकांनी प्रशासनाला कित्येकदा निवेदन दिले. मनसर -रामटेक महामार्गालगत सर्व्हिस रोड होणे गरजेचे आहे. कारण रामटेक शहरालगत असलेल्या खिंडसी, नागार्जुन, अंबाला टर्निंग, उपजिल्हा रुग्णालय, नगारा तलाव, बसस्थानक, गौळण नाल्याजवळील शीतलवाडी, खैरी बिजेवाडा येथे रेल्वे क्रॉसिंगचे काम झालेले नाही. मनसर येथील सर्व्हिस रोडचे काम अपूर्ण आहे. व परिसरातील अनेक गावातील शेतकरी महामार्गाने जात असतात. रस्त्यावर  मोठी घटना घडू शकते. वाहिटोला गावाकडून जाताना अनेक नागरिक विरुद्ध दिशेने प्रवास करतात. त्यासाठी  महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हिस रस्त्याचे काम करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे मनसर-रामटेक-सलाई (खुर्द) महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर या रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने धावतात. गावालगतच्या लोकांना अपघातांपासून वाचवण्यासाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी सर्व्हिस रोड अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र ६ वर्षांनंतरही काम अपूर्ण आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणाबरोबरच वनविभागाची जमीनही आहे. हे अडथळे कधी दूर होतील? लोक याची वाट पाहत आहेत. अपूर्ण सर्व्हिस रोडवर अनेक ठिकाणी अतिक्रमण व वनविभागाचे अडथळे असल्याचे राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता जगताप यांनी वर्षभरापूर्वी सांगितले होते. हे अडथळे दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आजपर्यंत हे अडथळे दूर करण्यात...

खासदार, आमदाराच्या कान्हाडोळा

लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर खासदार रामटेकच्या कामाकडे लक्ष देत नाहीत. त्यांच्या अंतर्गत महामार्गाची कामे येतात. त्यांना फोन केल्यावर प्रतिसाद मिळत नाही. लोकांनी तक्रार कुठे करावी? मंत्री आशिष जयस्वाल हेही सर्व्हिस रोडच्या समस्येकडे लक्ष देत नाहीत...

Post a Comment

Previous Post Next Post