महाराष्ट्र वेदभुमी

जातनिहाय जनगणनेवर भाजप कडून जनजागृती


जातनिहाय जनगणनावरून रामटेकात फटाके फोडून जल्लोष...

प्रतिनिधी:सचिन चौरसिया

 रामटेक :- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्सने आगामी जनगणनेत जातींच्या जनगणनेचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. यावरून सध्याचे सरकार देशाचे आणि समाजाचे सर्वांगीण हित आणि मूल्यांसाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते असे म्हणत रामटेक येथे माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांचेसह कार्यकर्त्यांनी या ऐतिहासिक निर्णयाबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जिल्हा भाजपा कडुन फटाके फोडून मनःपूर्वक अभिनंदन व्यक्त केले आहे. याबाबद दि. ३ मे रोजी रेड्डी यांच्या रामटेक येथील भाजप कार्यालयात पत्रपरिषद घेऊन मोदी सरकारच्या निर्णयाचे कौतुक करीत जल्लोष साजरा केला. काँग्रेस सरकारने आजवर जातीय जनगणनेला विरोधच केला आहे. स्वातंत्रानंतर झालेल्या सर्व जनगणनेत जातींची गणना झाली नाही. स्वातंत्रानंतर पहिल्यांदाच जनगणने बरोबरच जाती निहाय जनगणना योग्य पद्धतीने होणार आहे. जातीय जनगणना करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयामुळे समाज आर्थिक आणि समाजिकदृष्ट्या मजबूत होईल आणि देशाची प्रगती अखंडपणे सुरू राहील असे सांगत त्याआधीही समाजातील गरीब घटकांसाठी १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली होती, तेव्हा समाजातील कोणत्याही घटकात तणाव नव्हता असे रेड्डी यांनी माहीती देतांना सांगितले. यावेळी उपस्थितांमध्ये माजी आमदार मल्लीकार्जुन रेड्डी यांचेसह माजी जी.प. सदस्य सतीश डोंगरे, माजी न.प. उपाध्यक्ष आलोक मानकर, उमेश पटले, करीम मालाधारी, चंदु बैस, रामा अडामे यांचेसह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post