सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- नगरधनमध्ये ७२ हजार ७५० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणार्या सराईत तीन घरफोड्यांना रामटेक पोलिसांनी अटक केली आहे... रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत २ मे रोजी नगरधन येथील रहवासी निलेश मुळे यांच्या घरातील दरवाजाचे लॉक तोडून आत बेडरूम मध्ये प्रवेश घेत कपाटातील सोन्याच्या दोन चेन, दोन अंगठ्या, कानातील दागिना आणि सोने व काळे मणी असलेली पोत आदी दागिन्यांच्या किमतीत घोळ चोरट्यांनी चोरून नेल्या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किमत ७२,७५० रुपये चोरी झाल्याची घटना असल्याचे पोलिसांनी कागदोपत्री नमूद केले... या संदर्भात रामटेक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला... वास्तवात बाजारभावाप्रमाणे त्या दागिन्यांची किंमत तीन लाख रुपयांपेक्षा अधिक आहे... तिघेही सराईत चोरटे असून, त्यांच्याकडून चोरी व घरफोडीच्या इतर घटना उघड होण्याची शक्यता तपास अधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक मधुकर सापावार यांनी व्यक्त केली... दागिने चोरून नेले. घरी परत आल्यावर चोरी झाल्याचे लक्षात येताच नीलेश मुळे याने पोलिसात तक्रार दाखल केली... रामटेक पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे रामाला ताब्यात घेत विचारपूस केली. गुन्ह्याची कबुली देत त्याने साथीदारांची नावे सांगितली... त्यामुळे पोलिसांनी अन्य दोघांना ताब्यात घेत तिघांना अटक केली... ही कारवाई ठाणेदार आसाराम शेटे यांच्या मार्गदर्शनात हवालदार अमोल इंगोले, अर्पितकुमार पशिने, उमेश गाढवे, शिवशंकर भोयर, आतीश गाढवे, योगेश कुयटे, सतीश ईप्पर यांच्या पथकाने केली...
