महाराष्ट्र वेदभुमी

रामटेकमध्ये औषधी विक्रेत्यांची कार्यकारिणी सभा


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- औषधी व्यवसाय करतांना येणाऱ्या अडचणी, ऑनलाईन औषधी विक्री करणाऱ्या मोठ मोठ्या कंपन्या, औषधांवर नियमबाह्य पद्धतीने देण्यात येणारी सूट, शासनाकडून निर्गमित झालेल्या नवीन सूचना आणि कायदे, डॉक्टरांकडून नियमबाह्य पद्धतीने करण्यात येत असलेली औषध विक्री तसेच रुग्णांना कश्याप्रकारे सुविधा पुरवू शकतो अशा अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरीय समिती नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे पदाधिकारी यांनी २७ एप्रिल ला रविवारी रामटेक मध्ये सभेचे आयोजन केले होते... या सभेला रामटेक, मौदा आणि पारशिवणी चे सदस्य उपस्थित होते. आयोजनाची जिम्मेदारी रामटेक चे इसी मेंबर भूषण देशमुख आणि सदस्य यांचेवर सोपविली होती. सदस्यांच्या विविध प्रश्नांना एनडीसीडीए चे अध्यक्ष राजीव उखरे आणि सचिव  संजय खोब्रागडे यांनी उत्तरे देऊन समाधान केले... सभेला उपाध्यक्ष रिटेल श्याम चरोडे उपाध्यक्ष ग्रामीण प्रमोद कोल्हे कोषाध्यक्ष पुनीत ठक्कर सहसचिव नंदकिशोर टापरे सह मौदा तालुक्याचे इसी अजय आस्वले आणि पारशिवनी तालुक्याचे इसी केशव केने उपस्थित होते... या निमित्ताने व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे राजेश किंमतकर रामटेक, नरेंद्र बावनकुळे पारशिवनी आणि राजेश देशमुख मौदा याचे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला...

Post a Comment

Previous Post Next Post