जान्हवीला व्हायचे आहे इंजिनिअर
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : यंदा मुलींनीच बाजी मारली असून तालुक्यात पहिली येण्याचा बहुमान रामटेकातील जान्हवीनी मिळवला आहे... फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल जाहीर झाला असून नागपूर विभागातुन ९१.८८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत... राज्यात १२ वी परीक्षेच्या निकालात मुलींनी बाजी मारली असून प्रथम येण्याचा मान देखील रामटेककन्येला मिळाला आहे... नागपूरमधील रामटेक गावातील राष्ट्रीय आदर्श विद्यालयाची विद्यार्थिनी असुन जान्हवी प्रशांत फुरसले इने सायंसमध्ये ९२.३३ टक्के गुण घेवून रामटेक तालूक्यातून संभवत प्रथम आली... जान्हवीला कंम्पुटर्स इंनिअरिंग कींवा इन्फार्मेशन टेक्नालाजी मध्ये इंजिनिअर व्हायचे आहे. तीची आई गृहणी असून वडील किट्स मधे नौकरी करतात... जान्हवीला दहावी मधे ९०.८० टक्के गुण होते... बारावी मधे भरारी घेत ९२.३३ मिळाले. तिच्या या यशाबद्दल तिच्या विद्यालयातून आणि तालुक्यातून तिचं कौतुक व अभिनंदन केलं जात आहे... तिने आपल्या यशाचे श्रेय गुरुजन व आईवडील यानां दिले...
