महाराष्ट्र वेदभुमी

कोलाड-खांब परिसरात विजेचा कडकडाट वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस,

भातपिकासह, आंबा बागायतदार, विटभट्टी व्यावसायिक यांचे नुकसान, विजपुरवठा ही खंडित, 

पुगांव रोहा(नंदकुमार कळमकर):कोलाड-खांब परिसरात मंगळवार दि ६ मे पासून तीन दिवस पडत असलेल्या विजेच्या कडकडासहित वादळवाऱ्यासह जोरदार पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे भातपिकासहित आंबा बागायतीदार तसेच विटभट्टी व्यावसायिक यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे... याच बरोबर विज पुरवठा ही खंडित झाल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला...   हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड जिल्ह्यासह संपूर्ण कोकणात तीन ते चार दिवस जोरदार पाऊस पडेल हा अंदाज खरा ठरत मंगळवारी दि. ६ मे पासून तीन दिवस विज वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस बरसाला  आणि भातपिकासहित आंबा बागायतीदार, विटभट्टी व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोलाड-खांब परिसरात काही ठिकाणी उन्हाळी भातशेती केली जाते... ही भात शेती अंतिम टप्प्यात आली असुन येथील काही शेतकऱ्यांनी भातशेतीची कापणी करून ठेवली आहे...परंतु कापून ठेवलेल्या भातशेतीमध्ये पाणी शिरल्यामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे..    तसेच सतत पडत असलेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे अंब्याची फळे गळून पडल्यामुळे आंबा बगायतीदारांचे प्रचंड मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच विटभट्टी व्यावसायिक यांचे वीट भट्टी रचण्याचे काम अंतिम टप्यात आले असुन या पावसामुळे विट्टभट्टीत पाणी गेल्याने विटभट्टी व्यावसायिक यांचे ही मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे... तसेच कामावर जाणारे कामगार यांची ही अवकाळी पावसामुळे तारांबल उडाली...

Post a Comment

Previous Post Next Post