अहिल्यानगर: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चतरू येथील सिंगपोरा भागात झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत अहिल्यानगरमधील जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले. त्यांच्या शौर्यपूर्ण बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.
जवान संदीप गायकर हे गेल्या सहा ते सात वर्षांपासून भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते... देशसेवेचे व्रत पत्करत त्यांनी अनेक दुर्गम भागांमध्ये कर्तव्य बजावले... मात्र, दहशतवाद्यांविरोधात झुंज देताना त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली... गायकर यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा (अहिल्यानगर) येथे उद्या (२३ मे) आणण्यात येणार असून त्यांच्या वीरमरणाची बातमी गावात पोहोचताच हळहळ व्यक्त करण्यात येतय... संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे... (२३ मे) ब्राम्हणवाडा गावात संदीप गायकर यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहे... शहीद गायकर यांच्या पश्चात त्यांचे वडील पांडुरंग गायकर, आई, पत्नी व एक लहान मुलगी असा परिवार आहे...