वैष्णवीला न्याय मिळावा सर्वांची नैतिक जबाबदारी आहे...
मंत्री आदिती तटकरे यांनी स्व. वैष्णवी हगवणे यांच्या पालकांची भेट घेत त्या त्यांच्या दुःखात सहभागी झाल्या ..ही घटना अत्यंत वेदनादायक असून एक संवेदनशील मुलीने अन्यायाच्या सावटाखाली आयुष्य गमावते, यासारखं दुसरं दुःख नाही...
या कठीण काळात कस्पटे कुटुंबाच्या पाठिशी सर्व महाराष्ट्र शासन संपूर्ण ताकदीनं उभं आहे... वैष्णवीला न्याय मिळावा, ही आपली सर्वांची नैतिक जबाबदारी आहे...ज्या व्यक्तींनी तिच्यावर अन्याय केला, त्यांना कडक शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार तसेच.न्यायाच्या प्रक्रियेत कोणतीही तडजोड होणार नाही...
तसेच वैष्णवीचे बाळ सुखरुप असणं गरजेचं आहे, त्यासाठी बाळाची चांगल्या डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी व्हावी.. तसेच या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचेही ह्या घटनेवर बारकाईने लक्ष असुन पिडीत कुटुंबियांना नक्की न्याय मिळवून देऊ...
या दु:खद भेटीप्रसंगी महिला व बालविकास आयुक्त श्रीमती नयना गुंडे, श्रीमती वैशाली नागवडे, श्री.नाना काटे, श्रीमती रुपालीताई ठोंबरे उपस्थित होते...