सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- कृषि विभागाचे वतीने पंचायत प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात (दि.२३) तालुका कृषी निविष्ठा विक्रेता यांचे बैठकीचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या बैठकीला कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. या बैठकीला उपविभागीय कृषी अधिकारी कुमारी ग्रीष्मा डेहने, पंचायत समितीचे कृषी अधीकारी धनराज खोरगे, विस्तार अधिकारी विलास लठाड. रामटेक अग्रो असोसिएशन चे अध्यक्ष रवी नवघरे होते. संचालकांनी शेतकऱ्यांना सेवा द्यावी कारण नावामध्येच ‘कृषी सेवा आहे. त्यामुळे हे विसरुन चालणार नाही. कृषी केंद्र संचालकांनी साठेबाजी करु नये, त्यासाठी साठा फलक व भावफलक अद्यावत ठेवावा. तालुक्यातील शेतकरी बांधवाना गुणवत्ता व दर्जेदार प्रमाणित बी-बियाणे, रा. खते, कीटकनाशके यांचा सुलभ व वेळेवर पुरवठा करावा. सर्व कृषी सेवा केंद्र संचालकांना कृषी निविष्टा विक्री बाबद सूचना देण्यात आल्या, यामध्ये बियाणे साथी पोर्टल तसेच रा. खते पि.ओ.एस मशीन द्वारे विक्री करणे, बंधनकारक राहील, तालुकास्तरावर शेतकऱ्यांचे तक्रारी चे अनुषंगाने पंचायत समिती रामटेक कृषी विभागात तक्रार कक्षा ची स्थापन तालुका भरारी पथक, कृषी केंद्राच्या दर्शनी भागात शेतकऱ्यांना तक्रार करण्याकरिता संबधीत अधिकारी यांचे नावाचे बॅनर लावण्यास व प्रचार प्रसिद्धी, तसेच ऍग्रीस्टॅक योजने अंतर्गत फार्मर आयडी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. चढ्या भावाने कुठल्या ही निविष्ठाची विक्री करून नये, खतासोबत विक्रेत्यांनी लिंकिंग करून विक्री करू नये.शेतकऱ्यांच्या विषयी कृषी विक्रेत्यांनी चांगल्या भावना ठेवून, चांगल्या दर्जाच्या निविष्ठाची विक्री करावी व आपल्या प्रतिष्ठानच्या विषयी शेतकऱ्यांमध्ये विश्वास कायम ठेवावा. शेतकऱ्याची बोगस बियाणे व इतर निविष्ठा विक्री संबंधित तक्रार येता कामा नये, जर आल्यास कारवाईला समोर जावे लागेल अशी तंबी पंचायत समिती कृषी अधिकारी खोरगे यांनी दिली.. यावेळी तालुक्यातील कृषी विक्रते उपस्थित होते.....
उपविभागीय कृषी अधिकारी कु.ग्रिष्मा डेहणे
शेतकऱ्यांनी नेहमीच आपल्या केंद्रस्थानी असले पाहिजे. त्यांना दर्जेदार बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करून देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. 'साथी पोर्टल' आणि 'पॉस मशीन'चा वापर करून खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता आणा. मुदतबाह्य मालाची विक्री सक्तीने टाळा आणि कोणत्याही प्रकारची लिंकिंग करू नका... या सूचनांचे पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी भरारी पथके कार्यरत राहणार असून, नियमांचे उल्लंघन आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल... शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिल्यास आपला व्यवसायही वाढेल आणि शेतकऱ्यांचे भले होईल...