सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- स्नेहसदन दिव्यांग मुलांची विशेष शाळा,शितलवाडी रामटेक येथे नामदार आशिष जयस्वाल दिव्यांग कक्ष तर्फे दि.२३ मे ला वयोश्री व दिव्यांगांना साहित्य वाटप करीता निःशुलक मोजमाप शिबिर घेण्यात आले. यात वयोश्रीचे ४५ लाभार्थी व दिव्यांग प्रवर्गातील ७४ लाभार्थ्यांना साहित्यकरिता पात्र ठरविण्यात आले. या शिबिरात कर्ण दोष, अस्थिव्यंग, बहुविकलांग, सेरेब्रल पाल्सी, बौद्धिक अक्षमता प्रवर्गातील विद्यार्थ्यांची त्यांच्या गरजेनुसार तज्ञ डॉक्टरकडून तपासणी केली. यात श्रवण यंत्र, व्हीलचेअर, कॅलिपर, मोड्डिफाई चेअर, शालेय शैक्षणिक किट यासह दिव्यांग लाभार्थीनां सहज हलन चलन करिता आवश्यक साहित्य देण्यात येणार आहे. शिबिराराची व्यवस्था नामदार आशिष जयस्वाल दिव्यांग कक्ष चे रामेश्वर उईके, लक्ष्मीकांत कुमरे, स्नेहसदन दिव्यांग मुलांची विशेष शाळाचे मुख्याध्यापक पंकज पांडे, प्रवीण महल्ले, रश्मी काठीकर सह सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी पाहिली.,