महाराष्ट्र वेदभुमी

आगीत ०५ झोपड्या जळाल्या; संसारोपयोगी साहित्याची मदत करुन जपली सामाजिक बांधिलकी


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक:-  तालुक्यातील लोहडोगरी येथे शुक्रवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत ०५ झोपड्या जळाल्या... यात सायजा उईके, महेश नेवारे यांचे घरचे पूर्ण साहित्य जळाले... रात्री लागलेल्या आगीत रोजमजुरी करून कमावलेल्या रूपातून घरी लागणारे तांदूळ, गहू सह संसारउपयोगी साहित्य पूर्णपणे जळून राख रांगोळी झाली... भाजपा जिल्हासचीव अनिल कोल्हे यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी पीडित परिवाराला घटनास्थळी सहकर्यांसोबत जाऊन आगीत ज्यांचे घर पूर्णपणे जळाले ते सायजा उईके व महेश नेवारे यांना संसार उपयोगी सामान साहित्य वाटप करून मदत करण्यात आली... तसेच नगरधन जिल्हा परिषद सर्कल चे माजी सदस्य दुधराम सव्वालाखे तर्फे रोख रक्कमेची मदत भेट स्वरूपात दिली...याप्रसंगी माजी जिल्हापरिषद सदस्य दुधराम सव्वालाखे, भाजपा सोशल मीडिया संयोजक नंदकिशोर कोहळे, सरपंच राजेश कुभरे, ग्रा.प.सदस्य विनोद केळवदे,यादोराव ठाकरे, दिलीप मानवटकर, आशिष लील्हारे, रामू शहारे, बंडू वाघाडे सह गावातील नागरिक उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post