पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर): पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगाने युद्ध सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे... आपल्या देशात अनेक ठिकाणी पाकिस्तानी, रोहिंगे आणि बांगलादेशी घुसखोर असल्याचे निदर्शनास येत आहेत.भारत पाकिस्तान युद्धात भारत पाकिस्तानला तोंड देण्यासाठी सक्षम आहे...परंतु अंतर्गत भारतीय नागरिकांना वरील घुसखोरांपासून धोका होऊ शकतो...यामुळे याचा धोका होऊ नये यासाठी वरसगांव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी वरसगांव ग्रामपंचायत तसेच कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांना लेखी निवेदन देण्यात आले....
या लेखी निवेदनाच्या पत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की वरसगांव ग्रामपंचायत हद्दीत राहत असलेल्या पाकिस्तानी रोहिंगो तसेच बंगलादेशी यांचा शोध घेण्यात यावा तसेच या ग्रामपंचायत हद्दीतील सर्व व्यावसायिक व भाडयाने जागा देणारे घर मालक व जागा मालकांना याबाबत माहिती देऊन सर्व परप्रांतीय कामगार आणि भाडोत्री यांची संपूर्ण माहिती, ओळखपत्र,भाडेकरार ग्रामपंचायतीत जमा करण्याचे आदेश देण्यात यावे...कामगार किंवा भाडेकरू सोडून घेल्यास त्याची ही माहिती ग्रामपंचायतीला देण्याचे बंधन करावे... ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेल्या बांधकाम वैगरे कामाचे परप्रांतीय ठेकेदार आणि त्यांचे कामगार याची ही माहिती ग्रामपंचायतीकडे असावी...या परिसरात अशा प्रकारची एखादी घटना घडल्यास किंवा एखादा संशीयत आढळल्यास यांची संपूर्ण जबादारी त्यांना जागा किंवा घर भाड्याने देणारे मालक व कामावर ठेवणाऱ्या व्यावसायिकावर आणि पर्यायाने ग्रामपंचायत प्रशासनावर असेल याची नोंद घेणे आवश्यक आहे...
यावेळी वरसगांव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक प्रफूल्ल बेटकर,लाला शिंदे, विराज शिंदे, प्रसाद बेटकर, शेखर कुबल तसेच असंख्य नागरिक उपस्थित होते...
