सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- चक्रधर स्वामी विद्यालय मनसर येथे १५ में २०२५ ला इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेचा निकाल ९७.१४ % आहे. विद्यालयातून प्राविण्य प्राप्त विद्यार्थी निष्कर्ष नगरकर ८०.८० टक्के, नमन ओतेकर, ८० टक्के, कृतिका भोंगरकर ७९.४० टक्के, दीप्ती पारधी ७७.४० टक्के अनुष्का डबरासे ७६ टक्के गुण मिळाले. यां विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन संस्थेच्या व शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी संस्थाचे उपाध्यक्ष शांताराम गायकवाड, सहसचिव धनंजय गायकवाड, मुख्याध्यापिका सुरेखा गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाच्या औचित्य साधून प्राविण्य प्राप्त विद्यार्थी, शिक्षक दिनेश आडे, अरुण राठोड, गीता शेंद्रे, पालक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...
