मृतकाच्या कुटुंबीयांसह नागरीकांची पोलीस स्टेशनवर धडक
आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- उधारीच्या पैशाच्या वादावरून दोघ्या सख्ख्या भावाने एकाची धारदार शस्त्राने निघृण हत्या केल्याची घटना नुकतीच दि. १५ मे च्या रात्री ११ ते ११.३० दरम्यान रामटेक-दुधाळा मार्गावरील नगर परिषदेच्या क्वार्टर मागील भागात घडली... आरोपी दोघेही भावांना गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा जिल्हयातून शिताफीने अटक केली असली तरी मात्र या दोन्ही आरोपींना हत्याकांड घडवुन आणण्यासाठी हत्यार पुरवठा करणारे तथा त्यांना फरार होण्यासाठी आर्थिक हातभार लावणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी यासाठी नुकतेच मृतक हर्षल च्या कुटुंबीयांसह वार्डातील नागरीकांनी माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना निवेदनातून केली...
हर्षल धनराज कोटांगडे वय २६ वर्ष राहाणार विनोबा भावे वार्ड रामटेक असे मृतकाचे तर दुर्गेश राजकुमार इंगोले वय २८ वर्ष, स्वप्नील राजकुमार इंगोले वय २४ वर्ष अशी आरोपींची ची नावे आहे... आरोपी सख्खे भाऊ आहेत... पैशाच्या विषयावरून हा वाद झाला तथा वाद विकोपाला गेला दरम्यान आरोपींनी हर्षल वर चाकुने सपासप वार करून त्याला गंभीर जखमी केले... त्याला प्रारंभी उपजिल्हा रुग्णालय रामटेक व नंतर मेयो रुग्णालय नागपुर येथे नेत असतांना वाटेतच हर्षलचा मृत्यु झाला... अशी माहिती रामटेक पोलीसांनी दिली... रामटेक पोलीसांनी कलम १०३(१) , ३(५) नुसार गुन्हा दाखल केला असुन आरोपींच्या गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने मुसक्या आवळल्या... मात्र मृतक हर्षल च्या दुखावलेल्या कुटुंबीयांसह वार्डातील नागरीकांना यात समाधान नाही, तर या दोन्ही आरोपींना हत्यार पुरविणे तथा फरार होण्यासाठी आर्थिक मदत करणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करावी अशी मागणी दिलेल्या निवेदनात मृतक हर्षलच्या कुटुंबीयांसह वार्डातील नागरीकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांना केलेली आहे... निवेदन देतेवेळी माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन, धनराज कोटांगले, अंजीराबाई कोटांगले, हरीश्चंद्र कोटांगले यांचेसह वार्डातील नागरीक उपस्थित होते...
आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
आरोपींची फोटो पाहिली तर यांनी एवढा मोठा गुन्हा केला असेल असे वाटत नाही. मात्र या दोन सख्ख्या भावांनी हा हत्याकांड घडवुन आणलेला आहे. हर्षल ची हत्या करून दोन्ही आरोपी भंडारा जिल्ह्यात फरार झाले होते मात्र स्थानीक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने या दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली असुन यात आणखी कोणते धागेदोरे पोलीसांच्या हाती लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
