मुंबई वार्ताहर: कल्याणमध्ये एका इमारतीचे छत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत 6 नागरिकांचा मृत्यू झालाय... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून सहवेदना व्यक्त केल्या...
या ठिकाणी बचावकार्य आता पूर्ण झाले असून, महापालिका आयुक्त स्वत: घटनास्थळी उपस्थित होते... या घटनेत 5 जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे...तर जिल्हा प्रशासन त्यावर देखरेख ठेवून असून, जखमींची प्रकृती सुखरुप आहे... त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मुख्यमंत्री यांनी प्रार्थना केलीय...मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 5 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले...
