पनवेल जितिन शेट्टी : पनवेल महापालिकेचे प्रभाग अधिकारी सदाशिव राम कवठे यांचे अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले... पनवेल महानगरपालिकेतील जुने आणि अभ्यासू कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती... त्यांनी आतापर्यंत कळंबोली ,कामोठे प्रभाग अधिकारी म्हणूनही काम केले. महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागात यापूर्वी त्यांनी काम केले होते... एक कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती... सदाशिव कवठे यांच्या अकाली निधनामुळे एक चांगला आणि विश्वासू अधिकारी महानगरपालिकेने गमावला आहे. हसतमुख व्यक्तिमत्व सदाशिव कवठे यांच्या अचानक जाण्यामुळे सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो... त्यांच्या कुटुंबीयांना दुःख पचवण्याची ताकद देवो हिच युवा ग्रामीण पत्रकार संघ तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..
!!! विनम्र अभिवादन!!!
