सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड, नागपूर व कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकेरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र नागपूर व कामगार कल्याण केंद्र रामटेक यांच्या वतीने (दि.२४) ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कामगार व त्यांच्या कुटुंबियांना शिलाई प्रमाणपत्र व शिलाई मशीन देण्यात येणार आहे... यावेळी विविध योजनांचे धनादेश वाटपाचा कार्यक्रमही घेण्यात आला. यामध्ये कर्करोग व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पल्लवी आशिष जैस्वाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले... यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा नलिनीताई चौधरी, माजी नगरसेविका सुरेखाताई माकडे, लक्ष्मीताई मात्रे तसेच एचसीजी कॅन्सर सेंटर नागपूरच्या डॉ.कवलजीत कौर, नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रतिक घाटे उपस्थित होते... सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. २०० जणांनी कर्करोग व नेत्र तपासणीचा लाभ घेतला. काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय आणि विदेशी पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली... प्रतिभा भाकेरे यांनी कार्यक्रमाचा परिचय करून दिला... कार्यक्रमाचे संचालन कांचन वाणी यांनी तर आभार अनिता हरप यांनी मानले...
