महाराष्ट्र वेदभुमी

सुरेंद्र मेश्राम किट्समधून सेवानिवृत

 

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक : कविकुलगुरू इंन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलाजी अँड सायन्स ( किट्स) मधून सुरेंद्र मेश्राम ३० एप्रिल २०२५ ला सेवानिवृत झाले... त्यानी  किट्सच्या प्रोजेक्ट ऑफिस मध्ये  बांधकाम फोरमैन या पदावर  ३७ वर्षे सेवा केली... त्यानिमित्य प्रोजेक्ट विभाग तर्फे त्यांचा सेवानिवृती वर गौरव करण्यात आला. यानिमित्त प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला.या वेळी प्रामुख्याने प्रोजेक्ट ऑफीसर आर. श्रीनिवासराव, कुलसचिव पराग पोकळे, दिनेश जोशी, सय्यद इस्माईल, दिपक महाजन, दिलिप माकडे, सौरभ  पडोळे, नंदू घोडाकाडे, बापुराव गाथे, बलदेव कडीखाये, लिलाधर लांबट, रफीक मालाधारी सहित टेकनिकल कर्मचारी, मेंटेन्स कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी, सफाई कर्मचारी उपस्थित होते... त्यांच्या सेवानिवृति वर  त्यांच्या कार्याची  उपस्थितानी प्रशंसा केली... प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे म्हणाले की सुरेंद्र मेश्राम यानी संस्थेकरिता प्रामाणिक व तत्परतेने  सेवा दिली... सत्कारला उत्तर देताना सुरेंद्र मेश्राम म्हणाले की सर्व कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या सेवेकरीता तत्पर राहावे.. संचालन व आभार अतुल टेंभूर्णे यांनी मानले...

Post a Comment

Previous Post Next Post