सोगाव अलिबाग : अब्दुल सोगावकर
लहान बालकांना पोलिओ डोस पाजून केले उद्घाटन,
अलिबाग तालुक्यातील सोगाव अंगणवाडी येथे राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण मोहीम २०२४ चे आयोजन रविवार दि.३ मार्च २०२४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून करण्यात आले होते. या प्लस पोलिओ लसीकरणाचे सोगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर यांच्याहस्ते ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना पोलिओ डोस पाजून उद्घाटन करण्यात आले...
भारताला पोलिओ मुक्त करण्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार तर्फे ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम २०२४ अंतर्गत रविवार दि. ३ मार्च २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोगाव, चोरोंडे, सोगाव आदिवासी वाडी, चोरोंडे आदिवासी वाडी येथील ० ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना पालकांनी अंगणवाडीत घेऊन येऊन पोलिओ डोस पाजला...
पोलिओ डोस देण्याचा कार्यक्रम सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. दिवसभरात एकूण १२० बालकांपैकी ९५ बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आले, यावेळी सोगाव उर्दू अंगणवाडी सेविका रिजवाना मुल्ला, आशा वर्कर दिशा भगत, आरोग्य सेविका सी. एल. पाटील यांच्या देखरेखीखाली पोलिओ लसीकरण कार्यक्रम यशस्वी झाले...
सोगाव : सोगाव येथे राष्ट्रीय प्लस पोलिओ लसीकरण २०२४ कार्यक्रमाचे लहान मुलांना पोलिओ डोस पाजून उद्घाटन करताना मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर,
