महाराष्ट्र वेदभुमी

जिल्हास्तरीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते उदघाटन

 


उरण दि ४(विठ्ठल ममताबादे )

पॉवर लिफ्टींग स्पोर्टस असोशिएशन रायगड (रजि.) या संघटनेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य पॉवर लिफ्टींग असोशिएशन मुंबई तर्फे भैरवी मंगल कार्यालय, मुळगाव, श्रीराम नगर , जुना मुंबई- पूना  महामार्ग वोटसीला कंपनी जवळ येथे जिल्हा स्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टींग स्पर्धा नवोदित, सिनिअर, मास्टर (१,२,३,४) पुरुष व महिला गटासाठी आयोजित करण्यात आले होते...

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्रशेठ घरत, खालापूर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कृष्णाशेठ पारंगे, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल डवले, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रविण क्षीरसागर, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष अबुभाई खोत,पॉवर लिफ्टंग स्पोर्टस असोशिएशन राय‌गडचे अध्यक्ष गिरीश वेदक,सेक्रेटरी संजय देसाई, पंजाब नेशनल बैंक पनवेलचे प्रबंधक संगीता चौलकर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर जिल्हास्तरीय क्लासिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेचे उद्घाटन कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले...

यावेळी व्यायामाचे महत्व विशद करून सर्व स्पर्धेतील उमेदवारांना महेंद्र घरत यांनी शुभेच्छा दिल्या...

Post a Comment

Previous Post Next Post