सोगाव : अलिबाग अब्दुल सोगावकर
ग्रामपरिवर्तन विकास आघाडी मापगावतर्फे
कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची लाभणार उपस्थिती,
अलिबाग तालुक्यातील मूनवली येथे ८ मार्च २०२४ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून "ग्रामपरिवर्तन विकास आघाडी मापगाव" आयोजित 'गौरव नारी कर्तृत्वाचा' या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे...
मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील अनेक महिला व मुलींनी आपल्या बुद्धी व कर्तृत्वाने विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी करणाऱ्यां महिलांचा व मुलींचा मान्यवरांच्या हस्ते 'गौरव नारी कर्तृत्वाचा' ह्या सोहळा कार्यक्रमाचे "ग्रामपरिवर्तन विकास आघाडी मापगाव" तर्फे मापगाव पंचक्रोशीतील महिला महासंघ व महिला मंडळाच्या सहकार्याने व सहभागाने आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, व्याख्यान, प्रत्येक गावातील दोन महिलांना पैठणी, महिलांसाठी मनोरंजक खेळ, लकी ड्रॉ पध्दतीने विजेती महिलांना आकर्षक भेटवस्तू आदी कार्यक्रमाचे मूनवली येथील मैदानावर शुक्रवार दि. ८ मार्च २०२४ रोजी दुपारी ३:३० ते ६:३० वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे... कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना 'ग्रामपरिवर्तन आघाडी मापगाव तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे, तरी या कार्यक्रमाला महिला व मुलींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक 'ग्रामपरिवर्तन विकास आघाडी मापगाव' तर्फे करण्यात आले आहे...
