सोगाव : अब्दुल सोगवाकर
प्रखर साईभक्त असणारे किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या तर्फे गुरुवार दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी संध्याकाळी खंडाळे येथील साई मंदिरात आरती कार्यक्रमानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले...
पिंट्या गायकवाड यांना असलेली अध्यात्मिक ओढ सर्वश्रुत आहे, ते आपल्या पंचक्रोशीतील व अलिबाग तालुक्यातील बहुतांश अध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होत असतात. साईभक्त असल्याने ते नेहमी रांजणपाडा येथील साई मंदिरात न चुकता दर्शनासाठी जात असतात, यासाठी त्यांनी खंडाळे येथील साई मंदिरात दर्शनासाठी जाण्याअगोदर मंदिर विश्वस्तांशी संपर्क साधून आपल्या तर्फे महाप्रसादाचे वाटप करण्याची अनुमती घेऊन महाप्रसादाचे नियोजन केले... त्या अनुषंगाने त्यांनी गुरुवारी संध्याकाळी आरती कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्व भाविकांसोबत महाप्रसाद घेतला... मंदिर विश्वस्थांच्या वतीने खंडाळे सरपंच नाशिकेत कावजी यांनी पिंट्या गायकवाड यांचे स्वागत केले. तर मंदिर विश्वस्थांनी सरपंच पिंट्या गायकवाड यांचा सत्कार केला...
यावेळी सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या सोबत डॉ. किरण शेट्ये, किहीम ग्रामसेवक वनवे, निलेश उतेकर ,नदीम आत्तार, विजय मोरे उपस्थित होते...
फोटो लाईन :
पहिल्या चित्रात - खंडाळे येथील साई मंदिरात दर्शन घेण्यासाठी उपस्थित भाविक,
दुसऱ्या चित्रात : खंडाळे येथील साई मंदिरात सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या सत्कार करताना साई मंदिर विश्वस्थ,
