महाराष्ट्र वेदभुमी

संविधान,लोकशाही वाचवण्यासाठी 'भारत जोडो' अभियानात सहभागी व्हा ; उल्काताई महाजन


रोहा - प्रतिनिधी ;-

रोह्यात भारत जोडो अभियान आणि इंडीया अलायन्स मधील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक

 देशात कित्येक वर्षांपुर्वी आणीबाणी जाहीर झाली होती, त्या काळात बाबा आमटे यांनी भारत जोडो यात्रा काढली होती... भारत जोडो अभियान हा संदेश आपल्या सर्वांसाठी आहे... त्यामधील एकच भावना आहे की आपल्या अखंड भारत देशात पिढयांपिढ्या शतकांशतके विविध धर्मीय, विविध जातीय लोक, विविध पंथीय लोक एकत्रित गुण्यागोविंदाने नांदत आलेत... त्यामध्ये आज फूट पाडण्याचा प्रयत्न चालू आहे, एका धर्माला दुसऱ्या धर्माविरुद्ध भडकवणे एका जातीला दुसऱ्या जातीविरोधात उभं करणे आणि ज्या प्रकारचे फूट पाडली जात आहे ती संविधानाला अभिप्रेत नाही, संविधानात अशा अनेक गोष्टी घुसवणे आणि घडवून आणणे चालू आहे, त्याला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, लढाई कोणी एका पक्षाची नसुन जनतेची आहे... संविधान, लोकशाही वाचवण्यासाठी भाजपाला सत्तेतून हटवले पाहिजे यासाठी भारत जोडो अभियानात सर्वांनी सहभागी व्हा असे आवाहन भारत जोडो अभियानच्या राज्य समन्वयक उल्काताई महाजन यांनी केले...


रोह्यातील सार्वजनिक भाटे वाचनालाय येथे भारत जोडो अभियान आणि इंडीया अलायन्स मधील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली... यावेळी भारत जोडो अभियानच्या राज्य समन्वयक उल्काताई महाजन, शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, कांग्रेस तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देविदास जाधव,  महादेव साळवी, संतोष खेरटकर, राजेश काफरे,  शिवराम महाबळे, असिफ मुल्ला, इक्बाल पानसरे, समीर अधिकारी, निलेश वारंगे, सोपान सुतार, उमेश ढुमणे, रघुनाथ नाईक, जगदीश मोरे तसेच रोहा तालुक्यातील पेण श्रीवर्धन मतदारसंघातील काँग्रेस, शेकाप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) व भारत जोडो अभियानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते... 

उल्काताई महाजन पुढे म्हाणाल्या की, श्रीवर्धन मतदारसंघातून भाजपाला न पाडणारी १५ हजार मत मतदार यादीतून काढली आहेत, आणखी कोणत्या मतदारयादीतून नाव काढले असेल तर ते शोधून ती नांवे पुन्हा समाविष्ट करून घेण्याचे काम प्रत्येक इंडिया गठबंधनचे कार्यकर्त्यांचे आहे... भाजपाचे राजकीय मनसुबे खुप घातक आहेत, त्यांना जाती- जाती, धर्मा - धर्मा मध्ये तेढ निर्माण करुन सत्ता उपभोगची आहे.  संविधान बनवणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा दहन केला होता. बिजेपीला संविधान काढून मनुस्मृतीचे राज्य पुन्हा आणायचे आहे... आणि त्याची सुरुवात बनारस हिंदू विद्यापीठ अभ्यासक्रमात झाली आहे... असे सांगत ईव्हीएम संदर्भात तज्ञांची टीम चौकशी करत आहे ईव्हीएमला आमचा विरोध कायम सुरूच आहे,  याबाबत काही प्रकरणें कोर्टात सुद्धा सुरू आहेत त्याचा निर्णय काहीही असो, पण जनतेनी ईव्हीएम घोटाळे संदर्भात विचार न करता सर्वांनी भरघोस मतदान करावा, ही लढाई संविधान मानणारे व देश प्रेम करणारे प्रत्येक देशवासियांची आहे,  महाजन पुढे म्हणाल्या की, स्वतंत्र्याच्या लढाईंत संघाने किंवा भाजपाने कधीच भाग घेतला नाही, मनुस्मृती प्रमाणे दलीत, शुद्र आणि महिलांनी शिक्षण घेऊ नये.आज देशाच्या राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत त्यांना नवीन लोकसभा इमारतीच्या उद्घाटनाला आदिवासी आहेत म्हणून बोलावले जात नाही... हा आपला अपमान आहे...  असे महाजन यांनी सांगत गेली ७५ वर्षाच्या राजवटीत आताची सर्वात खतरनाक आणि भारत देशाला कित्येक वर्ष पाठीमागे नेणारी अशी ही राजवट भारतीय जनता पक्षाची आहे... भाजपा मनुस्मृती मानणारे आणि जुन्या रुढींकडे नेण्यारे पक्ष आहे तर दुसरीकडे भांडवलदारांबरोबर हात मिळवणी करून हा देश विकायला निघाले आहेत, मोठ्या उद्योगपती भांडवलदारांशी हात मिळवणी आणि मनुस्मृती या दोन शक्ती देशासाठी  सर्वात जास्त घातक आहेत. या देशाचा सर्वात मोठा पायाभूत कायदा म्हणजे संविधान कायदा, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीय नागरिकांना अर्पित केले आहे आणि आता सरकार संविधाननुसार काम करते की नाही ती तपासाण्याची जबाबदरी नागरिकांची आहे. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या सरकार संविधान मानायला तयार नाहीत, संविधानाची पूर्णपणे पायीमल्ली होत आहे... अशा वेळेला राजकीय पक्षाची जबाबदारी तर आहेच पण आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी सरकारवर अंकुश ठेवून संविधान पाळलेच पाहिजे आणि जर तुम्ही संविधानाच विरोधी बोलत असाल तर तुम्हाला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, भारत अभियान हे कोणत्याही पक्षाचे सलग्न नसून भारतीय संविधानाला मानणारी आणि नागरिकांची ताकद देणारी ही आघाडी देशभरात काम करत असून आमचा अजेंटा अराखडा जनतेपर्यंत पोहचवण्याचा काम करत आहोत. बीजेपी पक्ष सुसंस्कृत म्हणून दावा केला जात आहे. या सुसंस्कृत म्हणारे बिजेपी पक्षाची कपटनीती, कुटनीती पोलखोल उघड करण्याची गरज आहे... म्हणून आत्ता एकाच नारा भाजपा हटाओ संविधान बचाओ असे प्रतिपादन महाजन यांनी केले...


..............................


फोटो कॅपशन ;-


रोह्यातील सार्वजनिक भाटे वाचनालाय येथे भारत जोडो अभियान आणि इंडीया अलायन्स मधील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी भारत जोडो अभियानाच्या राज्य समन्वयक उल्काताई महाजन, शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, कांग्रेस तालुका अध्यक्ष सुनील देशमुख, देविदास जाधव, महादेव साळवी, संतोष खेरटकर, असिफ मुल्ला, इक्बाल पानसरे, समीर अधिकारी यांसह अन्य मान्यवर

Post a Comment

Previous Post Next Post