माणगाव (नरेश पाटील) : गुड फ्रायडेनिमित्त ख्रिस्ती बांधवांनी अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि गंभीरतेच्या वातावरणात प्रभू येशू ख्रिस्तांच्या क्रूसवधाची आठवण ठेवत धार्मिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला...
या पवित्र दिवसाची सुरुवात सकाळी ‘वे ऑफ द क्रॉस’ (क्रूसमार्ग) या धार्मिक विधीने झाली... भाविकांनी १४ स्थानांच्या माध्यमातून प्रभू येशूंच्या यातना व बलिदानाचे स्मरण करत प्रार्थना केली... यावेळी संपूर्ण परिसरात अत्यंत शांत, भक्तिमय आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले...
यानंतर दुपारच्या सत्रात चर्चमध्ये विशेष गुड फ्रायडे प्रार्थना सेवा पार पडली... या सेवेत पवित्र बायबलमधील वाचन, क्रूसाची वंदना तसेच सामूहिक प्रार्थना करण्यात आली... माणगाव व परिसरातील मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या सेवेत सहभाग नोंदवला....
या दिवशी उपवास, मौन आणि प्रार्थना यांना विशेष महत्त्व असल्याने अनेक भाविकांनी या धार्मिक परंपरांचे पालन केले... संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत पार पडला...
स्थानिक चर्च प्रशासन व सिस्टर्स यांचकडून कार्यक्रमाचे योग्य नियोजन करून संपूर्ण सोहळा सुरळीत व पवित्रतेने पार पाडला...
गुड फ्रायडेचा हा धार्मिक उत्सव ख्रिस्ती समाजाच्या दृढ श्रद्धेचे, एकतेचे आणि प्रभू येशू ख्रिस्तांच्या बलिदानावरील विश्वासाचे प्रतीक ठरला...
कार्यक्रमाच्या शेवटी भाविकांनी शांततेत प्रार्थना करत घरी परतताना नवचैतन्य, श्रद्धा आणि आध्यात्मिक समाधानाची अनुभूती घेतली...
