महाराष्ट्र वेदभुमी

सलग वीकेंडचा प्रभाव: मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी;

वाहतूक पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे वाहतूक सुरळीत

माणगाव (नरेश पाटील): लाँग वीकेंडच्या सुट्ट्यांचा परिणाम म्हणून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) वर माणगाव परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली... पर्यटनासाठी व गावी जाणाऱ्या नागरिकांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली होती...

मात्र, या वाढलेल्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे... प्रत्येक महत्त्वाच्या चौकात तसेच काही अंतरावर ट्रॅफिक वॉर्डन आणि होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली होती... त्यामुळे प्रचंड गर्दी असूनही वाहतूक सुरळीतपणे सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले...

दरम्यान, माणगावमार्गे दिघी-पुणे मार्गाने मुंबई-गोवा महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली होती... हा मार्ग महत्त्वाचा जोडमार्ग असल्याने येथे वाहनांची विशेषतः गर्दी दिसून आली...मोर्बा रोड कॉर्नर या महत्त्वाच्या चौकात तर वाहतूक नियंत्रणासाठी स्वतः वाहतूक विभागाचे प्रमुख अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहून परिस्थितीवर देखरेख करत होते... त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरळीत ठेवण्यात यश आले...

याच दरम्यान, टीव्ही ९ माणगावचे प्रतिनिधी पत्रकार दीपक दापके हेही घटनास्थळी उपस्थित राहून वाहतुकीच्या परिस्थितीचे प्रत्यक्ष वार्तांकन करताना दिसून आले... एकूणच, वाढत्या वाहतुकीच्या tv पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सतर्क व नियोजनबद्ध कामगिरीमुळे कोणतीही मोठी अडचण न येता वाहतूक सुरळीतपणे सुरू राहिल्याचे पाहायला मिळत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post