जि.प. शाळा, पटगोवारी येथे प्रारंभ
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तालुक्यातील पटगोवारी जि.प. शाळा, पटगोवारी येथे सुरू करण्यात आलेल्या आय.सी.टी. लॅबमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात सकारात्मक बदल घडताना दिसून येत आहे... आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान तसेच डिजिटल कौशल्ये आत्मसात करता येत आहेत... संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट बोर्ड व इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक स्वरूपात शिक्षण दिले जात असून, त्यामुळे शिक्षण अधिक सोपे, रंजक व परिणामकारक बनले आहे... या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासातील सहभागही वाढला आहे... या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास बळकट होत असून, ते नवीन तंत्रज्ञान शिकण्यास उत्सुक आहेत... शाळेत राबविण्यात येणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे... या उपक्रमासाठी शाळा समितीचे अध्यक्ष मनोहर माकडे व तसेच सर्व सदस्यगण यांचे नेहमी प्रोसाहन मिळत असते, मुख्याध्यापक वसंता मेश्राम, शिक्षक दयानंदजी मुंडे, शितल बडे, दिक्षा त्रिपाठी तसेच आय.सी.टी. प्रशिक्षक शैलेश रमेशजी मनघटे यांचे मार्गदर्शन लाभत आहे..
