नैसर्गिक शेतीला नवा सन्मान : ‘सर्वोत्तम शेती पद्धती’
सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- देशभरात नैसर्गिक आणि रसायनमुक्त शेतीबाबत वाढत्या जागरूकतेच्या पार्श्वभूमीवर देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान केंद्र यांना “सर्वोत्तम शेती पद्धती” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले... भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला...
रीजनल सेंटर फॉर ऑर्गेनिक अँड नॅचरल फार्मिंगचे प्रादेशिक संचालक डॉ. अजयसिंह राजपूत यांच्या हस्ते हा सन्मान संस्थेचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता यांनी स्वीकारला... या गौरवामुळे नैसर्गिक शेती क्षेत्रातील संस्थेच्या कार्याला नवी ओळख मिळाली आहे... पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना पद्मेश गुप्ता यांनी सांगितले की, “भारत हा कृषिप्रधान देश असून गौवंश आणि गौ-आधारित शेती ही त्याची खरी ताकद आहे...” गोमय व गोमूत्रावर आधारित वैज्ञानिक प्रयोगांद्वारे शाश्वत शेतीसाठी विविध उपयुक्त तंत्र विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले...नॅनो युरिया, पंचगव्यावर आधारित कीटकनियंत्रण, तसेच बैल-चालित टर्बाईनद्वारे वीज निर्मिती यांसारख्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होत आहेत. नैसर्गिक शेतीच्या दिशेने टाकलेले हे पाऊल केवळ सन्मान नसून, देशातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे... या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एनडीआरएफ संचालक ब्रिगेडियर आर. सत्यनारायण होते... यावेळी मुख्य अभियंता राजेश कुमार, डॉ. व्ही. एम. येल्लोरकर (प्रमुख वैज्ञानिक, पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ) आणि ऊर्जा तज्ञ प्रभात कनोजे यांची उपस्थिती होती... एनडीआरएफ अकादमी ऑडिटोरियम, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात विविध राज्यांतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला... गो विज्ञान अनुसंधान केंद्राचे सदस्य सतीश मोहोड व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनोज तत्त्वादी यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती... कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.स्वप्निल मगर यांनी केले...
