महाराष्ट्र वेदभुमी

शोभा खांडेकर यांना रायगड जिल्हा पुरस्कार प्रदान

 


पुगांव रोहा (नंदकुमार कळमकर): रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा धानकान्हे आदिवासीवाडी येथील उच्च शिक्षित व होतकरू शिक्षिका शोभा अलंकार खांडेकर यांना सोमवार दि. २७ एप्रिल २०२६ रोजी  विनोबा ॲप ओपन लिंक फाउंडेशन मार्फत दिला जाणारा यंदाचा स्पर्धा प्रमाण या विषयातील रायगड जिल्हा पुरस्कार रायगड जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा भोसले,शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, रायगड जिल्हा शिक्षणाधिकारी दहितूले यांच्यासह असंख्य मान्यवरांच्या उपस्थित देऊन गौरविण्यात आले आहे....

  शोभा खांडेकर यांना रायगड जिल्ह्यातील टॉप ५ शिक्षकांमधून हा पुरस्कार देण्यात आला आहे....त्या सन २०२४ मध्ये शिक्षण सेवेत भरती झाल्यानंतर त्यांनी अल्पवधीत कालावधीत शिक्षण सेवेत घेतलेली उंच भरारी आणि गोर गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून दिले जात असणारे मोलाचे शिक्षण त्याच बरोबर विविध सामाजिक संस्था मधून देत आलेले सामाजिक योगदान याची खरी पोच पावती या पुरस्काराने मिळाली आहे... या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात आले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post