मुंबई प्रतिनिधी( सतिश पाटील): ओडिशातील क्योंझर (Keonjhar) जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे... आपल्या मृत बहिणीच्या बँक खात्यातील पैसे काढण्यासाठी एका भावाला चक्क तिचे शव (कंकाल) कबरेतून बाहेर काढून बँकेत घेऊन जावे लागले... ओडिशातील ओडिशा ग्राम्य बँक, मल्लीपासी शाखा, पाटणा ब्लॉक, जिल्हा क्योंझर...
कोणी केले हे कृत्य?: जितू मुंडा (वय अंदाजे ५०-५५) या आदिवासी व्यक्तीने आपली बहीण कालरा मुंडा (वय ५६) हिचे शव नेले...
बहीण केव्हा वारली?: कालरा मुंडा यांचा मृत्यू २६ जानेवारी २०२६ रोजी झाला होता... त्या डायनाली गावात राहत होत्या...
पैसे का हवे होते?: त्यांच्या खात्यात १९,३०० ते २०,००० रुपयांच्या दरम्यान रक्कम होती... भावाला या पैशांची नितांत गरज होती...
बँकेची भूमिका आणि संताप: भावाने अनेकदा बँकेत जाऊन बहिणीच्या मृत्यूची माहिती दिली होती... मात्र, बँकेतील कर्मचाऱ्यांनी "खातेदार जिवंत नसेल तर पैसे मिळणार नाहीत, मृत्यू प्रमाणपत्र किंवा प्रत्यक्ष हजेरी हवी" अशी अट घातली होती... या जाचक नियमांमुळे त्रस्त झालेल्या भावाने अखेर आपली बहीण मरण पावली आहे हे सिद्ध करण्यासाठी, तिची कबर उकरून (Exhumed) तिचे सापळा/शव गोणीत भरून खांद्यावर बँकेत आणले... बँकेत शवाचे कंकाल पाहून खळबळ उडाली आणि ग्राहकांची धावपळ झाली... ही घटना समजल्यानंतर प्रशासनाने यावर दखल घेतली...त्या भावाला पैसे मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून मदत करण्यात आली, अशी माहिती मिळते... या घटनेमुळे सरकारी बँकांमधील अत्यंत कठोर नियम आणि सामान्य माणसाची होणारी कुचंबणा यावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे... या घटनेचा विडीओ व फोटो सद्या सोशल मिडियावर भरपूर व्हायरल होत आहे... काय या घटनेवरुन आम्ही विश्वगुरू म्हणून बोलू शकतो असा प्रश्न पडला आहे...
