महाराष्ट्र वेदभुमी

कामार्ले येथील रा.जि.प.शाळेत सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे स्मार्ट टीव्हीचे वितरण

चोंढी- अब्दुल सोगावकर : विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण घेता यावे या उद्देशाने सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे रायगड जिल्हा परिषद शाळा, कामार्ले येथे स्मार्ट टीव्हीचे वितरण करण्यात आले... हा कार्यक्रम स्व. रमेश (दादा) बाळकृष्ण पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आला होता...

    सदर उपक्रमासाठी साईल रमेश पाटील व समिहा साईल पाटील यांनी आर्थिक सहकार्य केले... या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले... कामार्ले गावातील रहिवाशी गणेश पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्या मार्फत सदर स्मार्ट टीव्हीची मागणी सक्षम एज्युकेशन कडे करण्यात आली होती... 

      याकार्यक्रमास सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे समिहा पाटील, साईल पाटील, गणेश भोईर, शार्दुल काठे, गणेश पाटील, विशाल आमले, परेश सुर्वे, ओंकार आमले, वासुदेव आमले, विशाल नाईक, संकेत थळे, हर्षल काठे, स्पृहा पाटील आदी सदस्य आणि श्रवण पाटील उपस्थित होते. तसेच माजी केंद्र प्रमुख विलास पाटील सर, कामार्ले ग्रामपंचायत सदस्या प्रगती पाटील मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा ठाकूर मॅडम, सहाय्यक शिक्षिका वेदिका अवती मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक समिती सदस्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुभाष भोईर सर यांनी केले...

फोटो लाईन : कामार्ले येथे सक्षम एज्युकेशन सोसायटीतर्फे स्मार्ट टीव्हीचे वितरण करतांना उपस्थित विद्यार्थी व इतर मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post