महाराष्ट्र वेदभुमी

जंगलाच्या कुशीत आदिवासी महिलांची मशरूम क्रांती

किरंगीसर्रा दुर्गम पट्ट्यात मशरूम उत्पादन 

सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक:-  तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या चोरबाहुली वनपरिक्षेत्रातील किरंगी सर्रा हे छोटेसे गाव… तिन्ही बाजूंनी घनदाट जंगल व मागे पेंच जलाशय… पण गाव निसर्गरम्य, दुर्गमतेमुळे रोजगार प्रश्न अशी वेदनादायक वस्तुस्थिती अशा कठीण परिस्थितीत आशेचा किरण ठरले चोरबाहुली वनपरिक्षेत्राने पुढाकार घेत गावात मशरूम उत्पादनाचा एक अभिनव उपक्रम सुरू केला. आज या उपक्रमामुळे गावातील १८ ते २० महिलांनी मशरूम उत्पादनाचे प्रशिक्षण घेवून घरबसल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये मशरूम तयार करत आहेत. अवघ्या एका महिन्यात उत्पादन तयार होते आणि चोरबाहुली गेटवर येणाऱ्या पर्यटकांना हे ताजे मशरूम विकले जाते. महिलांच्या हाताला काम मिळाले. घरात उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण झाला. आम्हाला आता जंगलात भटकंती करावी लागत नाही, घरबसल्या रोजगार मिळतोय असे समाधान व्यक्त करत महिलांनी आनंद व्यक्त केला. वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत वनरक्षक कृष्णा बेलकर आणि प्रियंका झारखंडे यांनीही मोलाची मेहनत घेतली असून, त्यांच्या योगदानामुळे हा उपक्रम यशस्वीपणे उभा राहू शकला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांनीही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केला. या गावाला सक्षम बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास आम्ही तयार आहोत,” असे त्यांनी सांगितले...

रोजगाराचा पूर्ण अभाव

पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या   पारशिवणी तालुक्याशी जोडणारा एकही रस्ता नसल्याने किरंगी सर्रा गाव पूर्णतः दुर्गम. रोजगाराच्या शोधात गावकऱ्यांना जंगलात मोहफूल गोळा करण्यासाठी जावे लागत होते. मात्र हा परिसर ‘कोअर झोन’ असल्याने वनविभागाच्या नियमांमुळे त्यावरही बंधने आली… आणि गावकऱ्यांसमोर उभा राहिला उपजीविकेचा गंभीर प्रश्न, अशी वेदनादायक वस्तुस्थिती

Post a Comment

Previous Post Next Post