महाराष्ट्र वेदभुमी

चौलमध्ये सुक्या चाऱ्याची भीषण टंचाई; पशुपालक अडचणीत, दूध उत्पादन घटले

अलिबाग (ओमकार नागावकर) : अलिबाग तालुक्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि पर्यटन व्यवसायामुळे ओळख असली तरी येथील अनेक कुटुंबांचे प्रमुख उत्पन्न स्रोत शेती आणि पशुपालन आहे... मात्र, मागील काही दिवसांपासून सुक्या चाऱ्याच्या भीषण टंचाईमुळे पशुपालकांवर मोठे संकट ओढवले आहे... सतत बदलणारे वातावरण, अवकाळी पाऊस आणि अनियमित हवामानामुळे चाऱ्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे... परिणामी, सध्या सुक्या चाऱ्याची तीव्र कमतरता जाणवत असून पशुपालक चिंताग्रस्त झालेत...

पुरेसा व पौष्टिक चारा उपलब्ध नसल्याने जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतोय... परिणामी दूध उत्पादनाचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले असून पशुपालकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे... एकीकडे दुधाला मिळणारा दर आणि दुसरीकडे वाढता खर्च यांचा ताळमेळ बसवणे कठीण बनलेय... या परिस्थितीत शासनाने तातडीने सुक्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पशुपालकांकडून होतेय... अन्यथा येणाऱ्या काळात पशुपालन व्यवसाय मोठ्या संकटात सापडण्याची भीती व्यक्त होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post