सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, घटनेत कंपनीचे मोठे नुकसान.
कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील
ट्रान्सवर्ड फर्टिकेम लिमिटेड कंपनीत बुधवारी १८ मार्च रोजी सायंकाळी पाच साडेपाच च्या सुमारास अचानक प्लांट मधील टेरेसवर असलेल्या कुलिंग टॉवरला आग लागल्याने सर्वत्र एकच खळबळ उडून हा हा कार माजला, तर आगीचे तांडव आणि धुराची कोंडी त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीतील सुरक्षा दल रक्षक आणि कामगार तसेच पाचारण करण्यात आलेल्या अग्निशमन दलाच्या सुरक्षा रक्षक दलाला मोठी कसरत करावी लागली असून अखेर शर्यतीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजले. मात्र अचानक लागलेल्या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजते. तर अधिकचा तपास सदरील पोलीस करत असल्याचे समजते...
सदरची मिळालेली माहिती अशी की औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्सवर्ड फर्टिकेम लिमिटेड या कंपनीत अचानक ऑफिस टेरेसवरती असलेले बंद स्वरूपात असलेल्या एफआरपी फायबरचे कूलिंग टॉवरच्या वेल्डिंगचे काम चालू असताना फायबरने अचानक पेट घेतला... त्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ही दुर्दैवी घटना घडली त्यात पूर्ण कॉलिंग टॉवर जळून खाक झालाअसून कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.. तर घडलेल्या घटनेत कामगारांच्या तसेच सेफ्टी सुरक्षा यंत्रणेच्या प्रसंगसावधेतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले... मोठ्या आगीच्या तांडवामुळे तसेच धुराच्या कोंडी मुले आजू बाजूचे ग्रामस्थ तूर्तास भयभयीत झाले होते. तसेच सदरची घटना घडताच कंपनी व्यवस्थापन यांच्याकडून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होत ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग ताबडतोब नियंत्रणात आणली. तसेच या घटनेची माहिती मिळताच सदरील पोलीस यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा तपास रोहा पोलिस निरीक्षक तसेच त्यांचे सहकारी युद्ध पातळीवर करत आहेत...