महाराष्ट्र वेदभुमी

कोमसाप उरण शाखेचे 125 वे साहित्य संमेलन थाटात साजरे

 

साहित्यलेखनात वास्तववादी लेखन आपल्याला अधिकाधिक यश आणि आनंद देत असते

साहित्यरत्न प्रा.एल.बी.पाटील.. यांचे प्रतिपादन 

उरण /18 मार्च / अजय शिवकर / उरण कोकण मराठी साहित्य परिषद उरणने आपल्या विमलातलावावर दर महिन्याच्या १७ तारखेला  कविसंमेलनाचा जो जागर ठेवला आहे,तेथे सादर होणा-या कविता या वास्तववादी असतात कारण तेथे उपस्थित असलेला श्रोतृवर्ग हा  ज्येष्ठ नागरिक,त्यांना ते वास्तव आनंददायी होते.लेखक कवींचे लेखन वास्तववादी असावे असे मत संमेलनाध्यक्ष साहित्यरत्न रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांनी पाले या गावी संपन्न झालेल्या १२५ व्या साहित्य संमेलनात मांडले...

    कोमसाप कार्याध्यक्ष प्रदीप ढवळ यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून आपल्या भाषणात नाविन्यपूर्ण लेखन आणि उपक्रमांची गरज आहे, हे विचार मांडून संमेलनाचे कौतुक केले. प्रास्ताविक शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे म्हात्रे यांनी केले.

  यावेळी कोमसाप कार्यकारिणी सदस्य जयू भाटकर, जिल्हाध्यक्ष संजय गुंजाळ, महाराष्ट्राची गझलकारा ज्योत्स्ना राजपूत, "बंडखोर पोरं" एड.गोपाळ शेळके , सुभाष कुडके,रायाप्पा माशाळे, गझलकार सिध्देश,लवेंद्र मोकल, ज्येष्ठ नागरिक प्रमुख चंद्रकांत मुकादम इत्यादी प्रमुखांची उपस्थिती होती...तसेच रामचंद्र म्हात्रे " गंध मातीचा". न.ग.पाटील यांच्या दोहे आणि मोग-याचा गंध " या तीन पुस्तकांचे  प्रकाशन झाले...

       जिल्ह्यातील २५ समाज सेवकांना कप्तान योगेश म्हात्रे, दिग्दर्शक वसंत चिरलेकर, आदर्श शिक्षक स.ज.पाटील, सुभाष कटकदौड इ.आणि  २५ ज्येष्ठ नागरिक आणि कवी,लेखकांना गौरविण्यात आले...

  २५ कवींच्या कवितांचा आनंद मनमुराद रसिकांनी अनुभवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना केणी, संपदा ठाकूर पाटील यांनी सुरेख केले...दौलत पाटील, अनिल भोईर, रमण पंडित, अनिता शिवकर, शिवप्रताप पंडित, किशोर पाटील, महेंद्र गावंड, अनंत पाटील, नरेश पाटील इत्यादी अन्य कोमसाप कार्यकर्त्ये स्वयंसेवकांची उत्तम बजावताने दिसले....

Post a Comment

Previous Post Next Post