प्रतिनिती : सचिन चौरसिया
रामटेक :- तब्बल १८ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नुकताच जाहीर झालेला नगरपरिषद रामटेकच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल रविवार (दि.२१) डिसेंबर रोजी लागला... रामटेक नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक २ (अ) मधून शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे उमेदवार पंकज शामराव लिल्हारे यांनी अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वर्धक ठरलेल्या लढतीत अवघ्या २४ मतांनी विजय मिळवला... ४० वर्षानंतर अंबाळा रामटेक येथे स्थायी नगरसेवकाच्या मान त्यांनी मिळवला... या अगोदर अंबाळा येथील रहवाशी स्वर्गीय राजेराम कोहळे यांनी अंबाळ्याचे प्रतिनिधित्व केले होते... तब्बल ४० वर्षानंतर अंबाळा येथील रहिवाशी पंकज शामराव लिल्हारे हे आता अंबाळा वार्डाचे स्थायी प्रतिनिधित्व करतील... त्यांच्या विजयामुळे शिवसेना कार्यकर्ता मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे... निवडणुकीत पंकज लिल्हारे यांना अंबाडा वार्डातून उमेदवांराच्या भरघोस प्रतिसाद मिळाला, असून पंकज लिल्हारे ४३२ मते, शैलेंद्र बकाराम नागपुरे ४०८ मते तर चंद्रभान मोहन शिवरकर ३५० मते, रितिक केशव अल्लडवार ६२ मते मिळाली... अत्यंत चुरशीच्या लढतीत पंकज लिल्हारे अवघ्या २४ मतांनी विजय प्राप्त केला... नवनिर्वाचित नगरसेवकाला प्रभागातील मतदारांनी व समर्थकांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक व विकासात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या... वॉर्डाचा व शहराच्या विकासासाठी पंकज लिल्हारे सक्रिय भूमिका बजावतील अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे प्रभागाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची पंकज लिल्हारे ग्वाही दिली...
