रायगड :- (नरेश पाटील): अंगारकी विनायकी चतुर्थीच्या पावन औचित्याचा लाभ घेत मे. अथर्व रिआलिटीज प्रा. लि. यांच्या किहीम येथील नव्या भव्य गृहसंकुल प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ ठाकूर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला... या मंगलप्रसंगी परिसरात उत्साहाचे वातावरण असून, किहीम परिसराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे...
या कार्यक्रमास कंपनीचे डायरेक्टर संतोष भिवंडकर, राजाभाऊ ठाकूर यांच्या पत्नी सौ. प्राचीताई ठाकूर, किहीम ग्रामपंचायतीचे उपसरपंच मिलिंद (बाबुराव) पडवळ, तसेच ग्रामपंचायत सदस्य संतोष किर,साहील म्हात्रे, दिनेश सोष्टे, गणेश भोईर, माजी सदस्य अजय म्हात्रे, उद्योजक निनाद काठे, प्रशांत थळे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते...
या कार्यक्रमासाठी वेळात वेळ काढून सपत्नीक उपस्थित राहिल्याबद्दल डायरेक्टर संतोष भिवंडकर यांनी राजाभाऊ ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व मनःपूर्वक आभार मानले... यावेळी त्यांनी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी मॅनेजर प्रशांत थळे व सुपरवायझर गणेश यांना राजाभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करून, स्थानिक सहकार्याच्या माध्यमातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या...
या नव्या गृहसंकुल प्रकल्पामुळे स्थानिक उद्योगांना प्राधान्य, तरुणांना रोजगाराच्या संधी, तसेच किहीम गावाच्या सौंदर्यात आणि विकासात भर पडणार असल्याचे मत व्यक्त करत राजाभाऊ ठाकूर यांनी डायरेक्टर संतोष भिवंडकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी शुभेच्छा दिल्या... किहीम गावासाठी हा प्रकल्प विकासाचा एक नवा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला...
