महाराष्ट्र वेदभुमी

"राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2025 "राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बहाल.

मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील): भांडुप गांव (पूर्व) येथील रहिवासी असलेले व आपल्या भांडुप गावास भुषणावह असलेले व्यक्तिमत्व !

ICT कुलगुरू प्रा.श्री.अनिरुद्ध भालचंद्र पंडित सर यांना भारताच्या राष्ट्रपतीं

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते " राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार "

भांडुप पूर्व येथील अद्वैत सोसायटीचे सदस्य (प्लॉट क्रमांक २४,श्री भाग्यद बंगला येथे रहाणारे रसायन तंत्रविज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील मुंबई स्थित प्रख्यात शिक्षण व संशोधन संस्थेचे ICT ( Institute of Chemical Technology) कुलगुरू प्राध्यापक डॉ.अनिरुद्ध भालचंद्र पंडित यांना आज महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते " राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार " देण्यात आला...सर भारतात पहिल्या क्रमांकावरचे आणि जगातील सर्वोत्तम अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान शास्त्रज्ञांच्या यादीत ९८ व्या क्रमांकावरचे शास्त्रज्ञ आहेत...

आदरणीय पंडित सर, तुमचा रसायन विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यासंग व आवाका अचंबित करणारा आहेच...पण त्याहीपेक्षा तुमचा निरहंकारी स्वभाव व साधेपणा तुमच्या बौद्धिक संपदेला आस्थेचे व विश्वासाचे कोंदण बहाल करतो...तुम्हाला यशाची अनेक गिरीशिखरे प्राप्त होवोत व तुमच्या व्यक्तिमत्त्वातील तपस्वी गुरूने अनेक सक्षम शिष्योत्तम भारत राष्ट्रासाठी घडवावेत.,.. आपण आपले व भांडुप गावाचे नाव उंच शिखरावर पोहोचवले आहे...पंडित सरांचे मनःपूर्वक अभिनंदन !

Post a Comment

Previous Post Next Post