प्रतिनिधी सचिन चौरसिया
रामटेक:- शितलवाडी येथील अदिती अशोक चव्हाण या युवतीने जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (युपीएससी) घेण्यात येणाऱ्या कम्बाइन मेडिकल सर्व्हिसेस परीक्षेत यश मिळविले आहे... तीची आता वैद्यकीय अधिकारीपदी निवड होणार आहे... केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून, या परीक्षेत आदिती यश मिळवत देशामध्ये ३८४ वा क्रमांक पटकावला आहे... तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक सुरू असून तिने तालुक्यातील तरुण-तरुणी समोर आदर्श निर्माण केला आहे... अदितीचा शैक्षणिक प्रवास प्रेरणादायी आहे... प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय कामठी येथून झाले... बारावी च्या परीक्षेत रामटेक तालुक्यात मेरिट आल्याचा मानही तिने मिळविला आहे... त्यानंतर नीट परीक्षेच्या तयारीसाठी तिने नागपुर गाठुन पहिल्याच प्रयत्नात नीट परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली... वैद्यकीय शिक्षणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथून वैद्यकीय शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले... त्यानंतर रामटेक येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे (आपला दवाखाना) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, शिस्तबद्ध वेळापत्रक आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तिने नीट ची पदव्युत्तर परीक्षा पास करून जळगाव येथे वैद्यकीय शिक्षण महाविद्यालय मध्ये स्त्रीरोग तज्ञ (ओबीजीवाय) या पदवीकरिता प्रवेश घेतला... तसेच युपीएससी ची कम्बाइन मेडिकल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण करत हे मोठे यश संपादन केले...
अदितीवर कौतुकाचा वर्षाव
या ऐतिहासिक यशाचे संपूर्ण श्रेय डॉ. अदिती चव्हाण हिने आपले वडील-आई, कुटुंबीय आणि गुरुजनांना दिले आहे... त्यांच्या सातत्यपूर्ण पाठिंबा, योग्य मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळेच हे यश शक्य झाल्याची भावना तिने व्यक्त केली आहे... ग्रामीण भागातून येऊन देशातील सर्वोच्च व अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवणारा हा प्रवास रामटेक तालुक्यातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे... अदितीच्या यशामुळे रामटेक परिसरात आनंदाचे वातावरण असून, विविध सामाजिक, शैक्षणिक व नागरिक स्तरावरून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...
