महाराष्ट्र वेदभुमी

भारतरत्न पी.व्ही.नरसिंहराव यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

प्रतिनिधी सचिन चौरसिया

रामटेक : माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव हे एक असे राजकारणी होते ज्यांना राजकीय क्षेत्रातील नेत्यांचा आदर होता आणि ते सार्वजनिक जीवनातील सर्व व्यक्तींसाठी प्रेरणास्थान होते. माजी पंतप्रधान (१९९१-२००४) यांनी आर्थिक सुधारणांचा पाया घातला ज्यामुळे देशभरात तंत्रज्ञान क्रांती झाली... माजी पंतप्रधान भारतरत्न पी. व्ही. नरसिंहराव यांच्या २१ व्या पुण्यतिथीनिमित्त रामटेक येथील कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (किट्स) येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संस्था सचिव व्ही. श्रीनिवासराव यांच्या हस्ते पी. व्ही. नरसिंहराव यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे, रजिस्ट्रार पराग पोकळे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पी. व्ही. नरसिंहराव यांनी सन १९८५ मध्ये रामटेक येथे किट्स संस्थेचे उद्घाटन केले होते. या संस्थेमुळे रामटेक व परिसरातील ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना  उच्च तांत्रिक शिक्षणाची संधी उपलब्ध झाली असून त्यांच्या शैक्षणिक योगदानाचा यावेळी उपस्थितांनी गौरव केला...

Post a Comment

Previous Post Next Post