महाराष्ट्र वेदभुमी

थेरोंडा ते श्रीक्षेत्र एकविरा – जय मल्हार मित्र मंडळाच्या ११व्या पालखी सोहळ्यास भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अलिबाग : जय मल्हार मित्र मंडळ–थेरोंडा आयोजित ११वा पदयात्री पालखी सोहळा भक्ती, समर्पण आणि परंपरेचा थोर वारसा जपत यंदाही अत्यंत दिमाखात सुरुवात झाली... बुधवार, दि. १० डिसेंबर ते रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत थेरोंडा ते श्री क्षेत्र एकविरा ही भक्तिमय पदयात्रा पार पडत आहे... थेरोडा खंडेराव पाडा येथील एकविरा मंदिरात मंगल महाआरती  करून पालखीचे भव्य, धार्मिक आणि मंगलमय प्रस्थान झाले...

बेंजोच्या सुरात घुमलेल्या “जय एकविरा माता” या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला... पदयात्रींच्या ओघात आणि एकविरा भक्तांच्या अखंड उत्साहात सोहळ्याचा प्रत्येक टप्पा समाधानकारक आणि श्रद्धामय ठरला...

सोहळ्याचे सुयोग्य आणि अचूक नियोजन अध्यक्ष सुरेल कोंडे, उपाध्यक्ष शरद नवगावकर, खजिनदार अतिल कोंडे, सेक्रेटरी श्री. रविंद्र चौलकर (बबल्या) व गुरव निरंजन भगत यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले...

या मंगल सोहळ्याची शान वाढविण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शाखाप्रमुख अशोक (अण्णा) नाईक, शिवसैनिक जनार्दन कोंडे, ज्ञानेश्वर टिवळेकर, विजय चौलकर आदी मान्यवर विशेष उपस्थित होते....

परंपरा, भक्ती आणि संस्कृती यांचे अनोखे द्योतक असलेला हा पालखी सोहळा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात पार पडत असून हजारो भाविकांच्या सहभागामुळे संपूर्ण मार्ग भक्तीरसाने ओथंबून वाहत आहे... चार दिवसांची ही पदयात्रा श्री क्षेत्र एकविरा येथे वैभवशाली धार्मिक उत्सवाने पूर्णत्वास जाणार आहे...

Post a Comment

Previous Post Next Post