रामटेक :- शेतमजुरांच्या टंचाईने मोठमोठे शेतकरी हातघाईस आले आहेत. गावात रिकामे बसतील, पण शेतात राबायला कुणी तयार नाही... धान कापणीच्या हंगामात तर चक्क शेतकऱ्यांना कुटुंबासह राबण्याची वेळ येते... आता यावरही मात करण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत... कमी वेळात आणि मोजक्या मजुरात धान कापणी करणारे यंत्र शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू पाहत आहे... रामटेक तालूक्यात २२ हजार हेक्टरमध्ये धान पिक घेतले जाते... यावर्षी पीक उत्तम आहे... सुदैवाने अवकाळी पाऊस आला नाही... परंतू धान काटणी करीता मजुराची कमी असल्याने धान कापनी करीता मजुराची वाट पाहावी लागत आहे... शेतकरी सहा ते सात हजार रुपये एकरी धान कापणी व बांधनी करीला देण्यास तयार आहेत... तरी मजुराची कमी आहे.... मजूर मिरची तोडणीला जात असल्याने धान कसे कापावे हा मोठा प्रशन शेतकरी कड़े आहे... हार्वेस्टरने धान कापणीकरीता एक तासाकरीता ३५०० रुपये देत आहे... हार्वेस्टरने धान कापणे व धान काढने एकाच वेळेस होत आहे... तेच धान सरळ राईस मिलमध्ये विकल्या जात आहे... शेतक-यांकडे भरपूर रोजगार असून सुद्धा मजूर उपलब्ध नसल्याने शेतकरी यांत्रीकीकरना कडे वळला आहे... मजुराला दुप्पट मजुरी देवून सुद्धा मजूर मिळत नाही... अशी व्यथा लोहोंगरी येथील शेतकरी भूषण घरजाळे व नारायण घरजाळे यांनी व्यक्त केली... ते म्हणाले की धान कापणीसाठी भंडारा, चंद्रपूर येथून मजूर दरवर्षी येत होते... परंतू यावर्षी बाहेरील मजूर कमी आले...
