वन्यजीव संघर्ष बळीराजाच्या जीवावर
अर्धवट खाल्लेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक :- नागपूर जिल्ह्यात वाढलेल्या मानव वन्यजीवी संघर्षात आणखी एका निष्पाप नागरिकाचा बळी गेलाय... शुक्रवार (दि.५) डिसेंबरला सायंकाळी पवनी वनपरीक्षेत्रातील मौदी गावात घडलेल्या वाघाच्या हल्ल्यात ५७ वर्षीय अशोक राधेश्याम उईके या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय... रामटेक तालुक्यातील मौदी गावाचे रहिवासी असलेले उईके चराईला गेलेल्या गाईचा शोध घेण्याकरिता गेले असता वाघाने त्यांच्यावर हल्ला केला... या घटनेने मौदी गावात प्रचंड खळबळ उडाली असून वनक्षेत्राच्या सीमेवर राहणाऱ्या ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या वाढत्या धोक्यावर प्रकाश टाकला आहे... मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी जनावरे चराय चारण्या साठी गेले असता जनावरे परत न आल्याने अशोक उईके स्वतः ११ वाजता जनावरे शोधण्याकरिता शेताच्या दिशेने गेले... त्यांना कल्पना नव्हती की दबा धरून बसलेला वाघ तिथे लपलेला असेल... त्या शिकारी प्राण्याने उईके यांच्यावर हल्ला केला... मात्र बराच वेळ उलटूनही अशोक घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी चिंताग्रस्त होऊन शोध सुरू केला... पोलीस पाटील मार्फत देवलापार पोलीस निरीक्षक, नागरिक आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्त शोध मोहीम सुरू केली... ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास चारगाव बीट क्र. ५८७ मधील जंगल परिसरात पाहणीदरम्यान अशोक यांचा छिन्नविछित्र मृतदेह आढळून आला... मृत व्यक्तीच्या नरडीचा घोट घेत शरीरापासून मुंडके वेगळे तसेच दोन्ही हात-पाय तोडलेले अवस्थेत मृतदेह सापडल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली... पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास कारवाई सुरू केली आहे... मृतदेहाची भीषण अवस्था पाहून वाघ किंवा इतर कोणत्याही नरभक्षक जंगली प्राण्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले... या भीषण घटनेमुळे मौदी आणि जवळपासच्या गावामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... वनविभागाकडून संबंधित वाघाच्या शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे... तसेच परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे... वनविभागाकडून सतर्कतेच्या इशारा म्हणून नागरिकांनी जंगलाच्या दिशेने जाने टाळावे. शेतात काम करताना अतिरिक्त सतर्कता बाळगावी असे आव्हान वन विभागाने नागरिकांना केले आहे... त्यांच्या कुटुंबीय, नातेवाईकांनी चिंताग्रस्त होऊन शोध सुरू केला... पोलीस पाटीलमार्फत देवलापार पोलीस निरीक्षक, नागरिक आणि वन विभागाच्या पथकाने संयुक्त शोध मोहीम सुरू केली... ८ ते ८.३० वाजताच्या सुमारास चारगाव बीट क्र. ५८७ मधील जंगल परिसरात पाहणीदरम्यान अशोक यांच्या छिन्नविछित्र मृतदेह आढळून आला... मृत व्यक्तीच्या नरडीचा घोट घेत शरीरापासून मुंडके वेगळे तसेच दोन्ही हात-पाय तोडलेले अवस्थेत मृतदेह सापडल्याने घटनास्थळी एकच खळबळ उडाली... पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास कारवाई सुरू केली आहे... मृतदेहाची भीषण अवस्था पाहून वाघ किंवा इतर कोणत्याही नरभक्षक जंगली प्राण्याने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले... या भीषण घटनेमुळे मौदी आणि जवळपासच्या गावामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... वनविभागाकडून संबंधित वाघाच्या शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत करण्यात आले आहे... तसेच परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे... वनविभागाकडून सतर्कतेच्या इशारा म्हणून नागरिकांनी जंगलाच्या दिशेने जाने टाळावे.. शेतात काम करताना अतिरिक्त सतर्कता बाळगावी असे आव्हान वन विभागाने नागरिकांना केले आहे...
