महाराष्ट्र वेदभुमी

गुलजार भाटकर यांच्या घराला लागली आग.

 


आग नियंत्रित.

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे नागरिकांचे म्हणणे...

सुदैवाने कोणतेही जीवितहानी नाही...

सिडको अग्निशमन यंत्रणा व पोलीस प्रशासन व रिक्षा चालकांच्या सावधानतेमुळे अनुचित प्रकार टळला...

उरण दि ११(विठ्ठल ममताबादे): उरण शहरातील राजपाल नाका येथे आज दुपारी ४:१५ च्या सुमारास गुलजार भाटकर यांच्या घरास अचानक पणे आग लागली... आग कशामुळे लागली याचे नेमकी कारण अद्याप स्पष्ट झाले नाही... सुदैवाने यात कोणतेही जीवितहानी झाली नाही...अशी माहिती उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हानीफ मुलांनी यांनी दिली... या आगीवर सिडको अग्नीशमन यंत्रणाच्या फायर ब्रिगेडने नियंत्रण मिळवले असून सिडको अग्निशमन यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी युद्ध जन्य परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळविले... सिडको अग्निशमन यंत्रणा व पोलीस प्रशासन व रिक्षा चालकांच्या सावधानतेमुळे अनुचित प्रकार टळला आहे... आग लागलेल्या घरात एकूण ३ मुली होत्या... आग लागल्याचे लक्षात येताच ३ मुलींनी दुसऱ्या मजल्या वरून खाली उडी मारली.रिक्षा चालकांनी या ३ मुलींचे जीव वाचविले... आग मोठी असल्यामुळे खूप मोठया प्रमाणात धूर सर्वत्र पसरले होते... दुसऱ्या मजल्यावर असलेले गुलजार भाटकर यांचे जुने घर जळून खाक झाले आहे... तळ मजल्या वर अशोक राजपाल यांचे इलेक्ट्रिक सामानाचे गोडावून होते... त्यात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे... नेमकी आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही... पोलीस प्राथमिक चौकशी करीत आहेत...आगीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते...उरणमध्ये आगीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post