मुंबई प्रतिनिधी :(सतीश पाटील): आज संपुर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात सानपाडा गावतील कन्येने नावलौकिक मिळवला आहे.. आणि आपणा सर्वांनाच त्याचा सार्थ अभिमान आहे कि ती आमच्या सानपाडा गावची कन्या आहे..कु. किर्ती जयेंद्र पाटील हीने महाराष्ट्राकडून ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धांमध्ये, उत्तर प्रदेशच्या टीमचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला... विशेष म्हणजे या ज्युनियर महिला टिमची हेड कोच म्हणून आपली गावंची कन्या कु. किर्ती जयेद्रं पाटील हीच्याकडे होता तसेच तीच्या मार्गदर्शनाखाली हा विजय मिळविला व संपूर्ण महाराष्ट्रा राज्याचे नाव लौकिक केले...ह्या अविश्वसनीय कामगिरी बद्दल कु किर्ती जयेद्र पाटील खुप खुप अभिनंदन.
आजच्या काळात फक्त शिक्षण घेऊन आणि नोकरी व संसार करणे म्हणजेच आपले जीवन सार्थक झाले असे नाही... आपल्या मुलांना खेळ क्रीडा याचे शिक्षण देणे आवश्य आहे... कदाचित हेच विद्यार्थी उदया देशाचे नाव उज्वल करू शकतात!मोबाईल गेम, रिल्स स्टारपेक्षा मैदानी खेळ अतिशय महत्वाचे आहेत... यातूनच भविष्य घडते...सानपाडा गावं पाऊल पुढे!
