महाराष्ट्र वेदभुमी

रायगड जिल्हा परिषद शाळा महादेववाडी येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा 2025 उत्साहात पार पडली.


अनंता म्हसकर रोहा धाटाव : १२ डिसेंबर २०२५ रोजी रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद शाळा महादेववाडी येथे आयोजित केलेल्या वार्षिक क्रीडास्पर्धा अत्यंत उत्साहपूर्ण आणि शिस्तबद्‌ध वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डी, धावणे, रिले, लांब उडी, दोर उडी, मातीचे शिल्पकार असे अनेक प्रकारच्या क्रीडा स्पर्धा खेळवल्या गेल्या या स्पर्धेमध्ये अनेक मुला-मुलींनी सहभाग घेऊन संपूर्ण स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत आत्मविश्वास आणि संघ भावना यांचे सर्वांकडून कौतुक झाले. विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरण समारंभात सन्मानित करण्यात आले क्रीडास्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिक्षकवर्ग, पालक, समिती सदस्य आणि स्वयंसेवक यांनी मोठे योगदान दिले... आयुष्यात जिंकायचं असेल तर खेळलंच पाहिजे!

खेळ आपल्याला आव्हानांचा सामना करण्याची ताकद देतात, आपल्यातील नेतृत्व क्षमता, खेळाडू वृत्ती वाढवतात व खेळाने आपले शारीरिक, मानसिक आरोग्यही सुदृढ राहते... म्हणूनच, खेळ हा केवळ छंद न राहता आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी खेळलच पाहिजे.. 

 तसेच कार्यक्रमचे उद्‌घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले... स्पर्धेची सुरुवात क्रीडामशाल प्रज्वलित करून करण्यात आली... या क्रीडा स्पर्धेसाठी श्री. किशोर तावडे साहेब मॅनेजर अंशुल केमिकल लि. धाटाव, श्री. अनिकेत अनिल भगत, सिव्हिल इंजिनिअर, श्री. हर्षद साळवी ( ऍडव्होकेट ), श्री. राम महाडीक (सामाजिक कार्यकर्ते), श्री. ज्ञानेश्वर खरीवले, श्री. प्रसाद घाग (सामाजिक कार्यकर्ते), श्री. दिपक साळुंखे, श्री. किशोर महाबळे, श्री. प्रविण सुतार, गं.भा. शेवंता हरिश्चंद्र भोईर, मा.माजी मुख्याध्यापक श्री. रामचंद्र भोईर सर, आदरणीय केंद्रप्रमुख धाटाव केंद्र तथा मुख्याध्यापक रा.जि.प. शाळा महादेववाडी श्री. नारायण गायकर सर श्री. संतोष तपकिरे सर, श्री. ललित लेंडी  सर, सौ.अश्विनी कारभारी मॅडम, सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. तेजस्विनी सुतार व सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्या सौ. समिधाताई सुतार, माजी विद्यार्थी संघ , ग्रामस्थ - महादेववाडी, महादेववाडी, शिवसमर्थ नगर, सर्व यूवक मंडळ,  सर्व वृंद विदयार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post