मुंबई प्रतिनिधी: (सतीश पाटील): अधिकृत नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळ,नामांतरासाठी प्रकल्पग्रस्तांचा लढा! भुमिपुत्रात असंतोष पसरला... नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते लोकनेते 'दि.बा. पाटील' यांचे नाव देण्याच्या मागणीने आता पुन्हा एकदा जोर धरला आहे... माहिती अधिकार अंतर्गत केंद्र सरकारकडून मिळालेल्या एका उत्तरामुळे नवीन आली असून नवी मुंबईतील भूमिपुत्रांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 'असे अधिकृत नाव सरकारच्या अधिकृत कागदपत्रावरून सिद्ध झाले आहे त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा लढा नामकरणासाठी नव्हे तर नामांतरासाठी असणार आहे माहिती अधिकार कार्यकर्ते तेजस पाटील यांनी राज्यातील विमानतळाच्या नामाकरणाबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे विचारणा केली होती... मंत्राच्या अंडर सेक्रेटरी दीपक नागपाल यांनी 19 डिसेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे की राज्यातील 16 विमानतळापैकी केवळ मुंबई आणि नागपूर या दोनच विमानतळांना महापुरुषाची नावे देण्यात आली आहेत... '25 डिसेंबर 2025 निषेध दिवस'..
मानकोली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ अशी तीन दिवसीय पायी दिंडी आचारसंहितेमुळे पोलिसांनी परवानगी नाकारल्याने तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.25 डिसेंबर निषेध दिवस विमानतळावरून दि.बा.च्या नामा विना विमान उडणार असल्याच्या निषेधार्थ 25 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता भूमिपुत्रांच्या गावोगावी काळे झेंडे आणि काळे फीत लावून निषेध नोंदवण्यात येणार आहे पुढील प्रक्रिया नामकरण नवे तर नामांतराची ठरणार आहे...
केंद्र सरकारच्या रेकॉर्डनुसार नवी मुंबईतील विमानतळाचे नाव अद्याप 'नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ' असेच आहे 'दि.बा.पाटील' यांच्या नावाचा कोणताही अधिकृत उल्लेख अद्याप केंद्राच्या दप्तरी नसल्याने आता होणारे पुढील प्रक्रिया नामकरण नसून नामांतरण ठरणार आहे...
आचारसंहितेनंतर मंत्रालयावर धडक
आचारसंहिता संपल्यानंतर पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र अधिक मोठ्या ताकदीने मुंबईतील मंत्रालयावर धडकणार असल्याचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. 13 जानेवारी 2026 रोजी 'दि.बा. पाटील' यांची 100 वी जयंती असल्याने 'जासई'येथील स्मृतिस्थळावर मोठ्या संख्येने जमून मानवंदना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील विमानतळाची स्थिती अशी मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विमानतळाची विभागणी खालील प्रमाणे आहे...
आंतरराष्ट्रीय विमानतळ: मुंबई- छत्रपती शिवाजी महाराज नागपूर डॉ़. बाबासाहेब आंबेडकर,नवी मुंबई आणि शिर्डी...
राष्ट्रीय विमानतळ औरंगाबाद पुणे कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, जुहू मुंबई, नांदेड, गोंदिया, अकोला, नाशिक, अमरावती आणि सिंधुदुर्ग, नवी मुंबई आणि नागपूर, वर्धा वगळता उर्वरित सर्व विमानतळे सध्या केवळ त्या त्या शहराच्या नावाने ओळखली जात असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे...
