महाराष्ट्र वेदभुमी

काटई नाक्याजवळ MIDC ची पाइपलाइन फुटली! हजारो लिटर पाणी वाया गेले.

मुंबई प्रतिनिधी:(सतीश पाटील): डोंबिवलीजवळील काटई नाक्याजवळ एमआयडीसीची ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन सोमवारी दुपारी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे...

डोंबिवलीजवळील काटई नाक्याजवळ एमआयडीसीची ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन सोमवारी दुपारी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले आहे... मेट्रोचे काम सुरू असताना ही पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे... सध्या सोशल मीडियावर पाईप लाईन फुटल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहे... व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाईपलाईन फुटल्यामुळे रस्त्यावर पाण्याचे लांबच लांब फवारे उडताना दिसत आहे... रस्त्यावर पाण्याचे मोठमोठे फवारे उडत असल्यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे... यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे... अधिकृत माहीतीनुसार मेट्रो लाईनच्या कामादरम्यान जेसिबीने खोदकाम चालू असताना मोठ्या पाण्याच्या पाईप लाईनला जोरदार फटका लागल्यावर मोठ्या प्रमाणात पाणी गळती चालू झाली. सर्व परिसरात पाणीच पाणी झाले... त्यामुळे रहिवाशी व रस्त्यावर वाहन चालकांची तारांबळ उडाली होती... जनतेत रोष निर्माण झाला होता सरकारी व सार्वजनिक बांधकाम खाते आणि एम एम आर डी, कंत्राटदार यांच्यामार्फत कामे केली जातात पण दक्षता न घेता निष्काळजीपणा आढळून येत आहे... अशा वेळी सरकारी मालमत्तेचे खूप मोठे नुकसान होत असते, ते टाळता आले पाहिजे... जनतेच्या टॅक्स मधून हा खर्च केला जातो...

Post a Comment

Previous Post Next Post