नगरपरिषदेतील शिक्षकांची वेतनासाठी वणवण
आमदार विकास ठाकरे यांच्याकडे निवेदन
प्रतिनिधी: सचिन चौरसिया
रामटेक : जिल्ह्यातील नगर परिषद शाळेतून सेवानिवृत्त झालेले शिक्षकांची पेन्शन, तसेच कार्यरत असलेल्या प्राथमिक शिक्षकांचे गत तीन महिन्यांपासून वेतन झालेले नाही... नागपूर विभागातील सेवानिवृत्त व कार्यरत शिक्षकांचे पगार अडले... त्यामुळे शिक्षकावर उपासमारीची वेळ आली आहे... नगरपरिषद व मनपातील शिक्षकांना पगार आणि पेन्शन वेळेवर न मिळाल्याने संताप व्यक्त केला असून, या संदर्भात महाराष्ट्र सेवानिवृत्त मनपा-न.प. शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांना निवेदन दिले. संघटनेने आमदारांना कळवले की मार्च पासून शिक्षकांना त्यांचे वेतन आणि पेन्शन तीन महिने उशिरा मिळत आहे... खाजगी शाळांतील शिक्षकांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला खात्यात जमा केले जातात... मात्र न.पा. व मनपा शिक्षकांचे वेतन ‘निधीचा अभाव’ असल्याचे कारण देत उपसंचालक कार्यालयाकडून जाणूनबुजून विलंबित केला जात आहे... याशिवाय, वैद्यकीय प्रतिपूर्तीची बिले मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असून, मंजूर झालेली नाहीत... याबाबत आमदारांनाही माहिती देण्यात आली... तक्रारी ऐकल्यानंतर आमदार विकास ठाकरे यांनी शिक्षण उपसंचालक सावरकर यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि नगरपरिषद आणि महानगरपालिका शाळांमधील शिक्षक आणि निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन दर महिन्याच्या १ तारखेला देण्याची विनंती केली... त्यांनी त्यांना ते सादर करण्याचे निर्देश दिले... भविष्यात काही समस्या उद्भवल्यास त्यांना थेट कळवू असे आश्वासनही त्यांनी दिले... बैठकीदरम्यान नागपूर आणि रामटेक येथील संघाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, पदाधिकारी आणि शिक्षक चंद्रशेखर धावडे उपस्थित होते...
