महाराष्ट्र वेदभुमी

पेण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 वार्ड क्रमांक दहामध्ये धनुष्य बाणाचा विजय निश्चित.!

 

पेण तालुका प्रतिनिधी :पेण नगरपरिषदेच्या निवडणुकित वॉर्ड क्रमांक 10 मधून शिवसेना(शिंदे गट) अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाशशेठ रामाणे व सौ.ज्योती म्हात्रे यांनी आपली उमेदवारी जाहीर केली. कारमेल स्कूल परिसरातील प्रसिद् सिद्धिविनायकाच्या मंदिरात नारळ वाढवून कार्यकर्त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. या प्रचार रॅलीमध्ये विशेष तरुण गटाचा, महिला गटाचा मोठा समावेश होता. तसेच विविध पक्षांचे अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते फिरताना दिसत होते. श्री.प्रकाश रामाणे व सौ.ज्योति म्हात्रे पेण नगर परिषदेचे माजी नगरसेवक होते. त्यांच्या कारकिर्दीतअनेक विकासाची कामे झाली. आज विचित्र युतीमुळे त्यांना वर्तुळातून बाहेर फेकले... आगामी येणाऱ्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूका समोर ठेवून. दादर गावच्या श्रीमती. जनाताई जोशी व निळकंठ म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली... सर्वत्र चर्चा आहे की हे दोन्ही उमेदवार रामवाडी, समर्थनगर मध्ये राहतात... आमच्या वृत्तप्रतिनिधीनी नगरसेवक पदाचे उमेदवार श्री.प्रकाश रामाणे व सौ.ज्योती म्हात्रे यांच्याबरोबर चर्चा केली असता ते म्हणाले मतदार संघ पूर्ण सुशिक्षित आहे... त्यांना चांगले, वाईट यातला फरक जाणवतो... 

विरोधी उमेदवार नीलकंठ म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीमध्ये रामवाडी येथील स्थानिक मतदारांपेक्षा दादर गावचा मोठा भरणा होता... माजी सरपंच, आजीमाजी कार्यकर्ते... ते वॉर्ड मधील खरेखुरे मतदार नाहीत...स्थानिक मतदारांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी हा मास्टर प्लॅन केला आहे... विरोधी उमेदवार नीलकंठ म्हात्रे यांना मागील दोन निवडणुकीत मतदारांनी त्यांची जागा दाखविली होती... मागिल निवडणुकीत देखील काही उमेदवारांना त्यांनी लाखोंचा गंडा घातला होता... बनवाबनवी करणे हा त्यांचा हातखंडा आहे... वार्ड क्रमांक नऊमध्ये आपला पराजय निश्चित आहे... या भीतीने ते वॉर्ड क्र.10 मध्ये उतरले आहेत... त्यांना वॉर्ड क्र.10 मध्येही मतदार त्यांची जागा दाखवेल... जनाताईची मते मीळावी म्हणून त्यांना जोडीला घेतले आहे.., अशी सर्वत्र चर्चा आहे... श्रीमती जनाताई या सन 2019 ते सन 2024 पर्यंत नगरसेविका होत्या... त्यांनी या वॉर्डमध्ये केलेले एखादे चांगले काम दाखवा? मीटिंग भत्याशिवाय दुसरे कोणते कामच केले नाही! हा वॉर्ड विस्ताराने मोठा आहे. महाडिकवाडी, देवनगरी, रामवाडी, समर्थनगर, आनंदनगर, असा या वॉर्डचा विस्तार आहे. सत्ता हातात असताना  नगरसेवक सक्षम नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व दमदार आमदार महेंद्र दळवी साहेब यांचा धनुष्य आम्हाला हातात घ्यावा लागला. आम्ही जनता जनार्दनाचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीत उतरलो आहोत. विकासासाठी आमच्या पाठीशी सर्वच पक्षांचा पाठिंबा आहे. प्रचार रॅलीतील गर्दी पाहता आमचा विजय निश्चित आहे. हा विजय आमच्या मतदारांचा आहे, जेष्ठ नागरिकांचा आहे, महिला भगिनींचा आहे, युवा शक्तीचा आहे. असं आम्हाला वाटते. मतदार सुशिक्षित आहे. त्याला चांगले वाईट यातला फरक कळतो. फक्त कोणीही संघर्षात जाऊ नये. वाद करू नये. शांत वातावरणात ही निवडणूक पार पडावी हा आमचा सर्वांना संदेश आहे. एकमेका सहाय्य करू, अवघा धरू सुपंथ! याबाबतचे वृत्त रामवाडी पेण येथील युवा सामाजिक कार्यकर्ते श्री.दिपक विठ्ठल रामाणे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले...

Post a Comment

Previous Post Next Post